आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यावर 'सुशांत सिंह राजपूत'ची डेथ मिस्ट्री:सुशांतसारखा हुबेहुब दिसणारा सचिन तिवारी साकारणार 'सुसाइड ऑर मर्डर'मध्ये मुख्य भूमिका, चित्रपटाचा फर्स्ट लूक आला समोर 

मुंबई2 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • शमिक मौलिक दिग्दर्शित हा चित्रपट सुशांतचा बायोपिक नाही तर त्याच्या आयुष्यापासून प्रेरित असेल.
 • या चित्रपटात छोट्या गावातून बॉलिवूडमध्ये येणा-या कलाकाराचा संघर्ष दाखवला जाईल, ख्रिसमसला रिलीज होऊ शकतो चित्रपट

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला दीड महिना उलटून गेला आहे. पोस्टमॉर्टम व व्हिसेरा अहवालाच्या आधारे पोलिस आत्महत्या म्हणून प्रकरणाची चौकशी करत आहे. मात्र सुशांतचे चाहते, कुटुंबातील सदस्य, काही सहकारी आणि काही राजकारणी याला हत्या असल्याचे सांगत असून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत आहेत. इकडे फिल्म इंडस्ट्रीतील याच पार्श्वभूमीवर एका चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे, त्यात सुशांतसारखा हुबेहुब दिसणारा आणि टिकटॉकर सचिन तिवारी सुशांतशी प्रेरित असलेल्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

 • 'सुसाइड ऑर मर्डर' हे आहे चित्रपटाचे शीर्षक 

चित्रपटाचे शीर्षक 'सुसाइड ऑर मर्डर: अ स्टार वॉट लॉस्ट' असे असेल आणि त्याचे दिग्दर्शन शमिक मौलिक करतील. यावर्षी ख्रिसमसच्या दिवशी ओटीटी प्लॅटफॉर्म व्हीएसजी बिंजवर हा चित्रपट रिलीज केला जाऊ शकतो. या चित्रपटाचा फर्स्ट लूक व्हीएसजीच्या सोशल मीडिया पेजवरुनही शेअर केला गेला आहे, ज्यात सचिन तिवारीला बॉलिवूडमधील आउटसाइडरच्या रुपात दाखवले गेले आहे.

पोस्टरच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "छोट्या गावातून आलेला एक मुलगा चित्रपटसृष्टीत एक चमकणारा तारा बनतो. ही त्याची कहाणी आहे. एका आउटसाइडरच्या रुपात सचिन तिवारी... विजय शेखर गुप्ता निर्मित आणि शमिक मौलिक दिग्दर्शित. संगीत श्रद्धा पंडित यांनी दिले आहे."  यापूर्वी हुबेहुब सुशांतसारखा दिसत असल्याने सचिनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

 • सप्टेंबरमध्ये हा चित्रपट फ्लोअरवर येऊ शकतो

निर्माते विजय शेखर गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, हा चित्रपट सुशांतची बायोपिक नाही. त्याच्या आयुष्यावरुन प्रेरणा घेण्यात आलेली आहे. सप्टेंबरमध्ये हा चित्रपट फ्लोअरवर येऊ शकेल. याचे शूटिंग मुंबई आणि पंजाबमध्ये होणार आहे.

14 जून रोजी घरात मृतावस्थेत आढळला होता सुशांत 

 • 34 वर्षीय सुशांत सिंह राजपूत 14 जून रोजी मुंबईतील त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला होते. सुशांतचा मृत्यू श्वास कोंडल्याने झाला असल्याचे पोस्टमॉर्टम व व्हिसेरा अहवालात स्पष्ट झाले आहे.
 • पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट अद्याप मिळालेली नाही. मात्र डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन आणि त्याच्या घरात मिळालेल्या औषधांवरुन तो डिप्रेशनमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु अद्याप आत्महत्येमागील खर्‍या कारणापर्यंत पोलिस पोहोचलेले नाहीत.
 • आतापर्यंत या प्रकरणी 35 जणांची चौकशी झाली आहे. यामध्ये यशराज फिल्म्सचे मालक आदित्य चोप्रा, सुशांतचे घरातील कर्मचारी, मॅनेजर, पीआर टीम, एक्स मॅनेजर, मित्र, मैत्रिणी, सह-कलाकार आणि कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. यशराज फिल्म्सचे काही माजी अधिकारी आणि कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांनीही आपला जबाब नोंदवला आहे. आणखी काही अधिका-यांची चौकशी केली जाईल. 
 • याशिवाय फिल्ममेकर संजय लीला भन्साळींचीही चौकशी झाली आहे. तर चित्रपट निर्माते शेखर कपूर यांनी ईमेलद्वारे आपला जबाब पोलिसांना पाठवला आहे. 
 • अभिनेत्री कंगना रनोटचीही पोलिस चौकशी करू शकतात. सुशांतला बॉलिवूडच्या नेपोटिज्मचा मोठा फटका बसल्याचा आरोप कंगनाने उघडपणे केला आहे, तर शेखर कपूर यांनीही काहीसे असेच संकेत दिले होते.  
 • दरम्यान, खासदार रुपा गांगुली, अभिनेता शेखर सुमन, टीव्ही अभिनेता तरुण खन्नासह अनेक जणांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. वकील, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकीय विश्लेषक ईशकरण सिंह भंडारी यांना या प्रकरणातील तथ्यांची चौकशी करत असून सीबीआयमार्फत या प्रकरणाची चौकशी करणे योग्य आहे की नाही हे तपासत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...