आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत आत्महत्या प्रकरण:वकिलांचा आरोप - मुंबई पोलिस रिया चक्रवर्तीविरूद्ध एफआयआर नोंदवत नव्हते, म्हणून पाटण्यात तक्रार दाखल करावी लागली

मुंबई3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • वकील विकास म्हणाले- मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास दुस-या दिशेला घेऊन जात आहे. कुटुंबावर मोठ्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव घेण्यास दबाव आणला जातोय.
 • सुशांतच्या कुटुंबावर शोककळा पसरली होती, त्यामुळे गुन्हा दाखल करण्यास जवळजवळ दीड महिना लागला.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी त्याच्या कुटुंबाचे वकील विकास सिंह यांनी मुंबई पोलिसांवर आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुशांतच्या वडिलांनी चार महिन्यांपूर्वी वांद्रा पोलिसांच्या डीसीपींकडे रियाविरुद्ध तक्रार केली होती, परंतु तिच्याविरोधात एफआयआर दाखल झाला नाही, म्हणून पाटण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 • रियाने सुशांतविरोधात मोठी प्लॅनिंग केल्याचा आरोप

विकास यांनी सांगितल्यानुसार, रिया सुशांतला सतत त्रास द्यायची असा आरोप सुशांतच्या वडिलांचा आहे. ती सुशांतच्या मनावर नियंत्रण ठेवत होती. ती त्याला त्याच्या कुटुंबाशी बोलू देत नव्हती. तिने कुटुंबाला सुशांतपासून तोडले होते. या घटनेमागे रियाची एक मोठी योजना होती. ती सुशांतच्या सर्व मेडिकल फाइल्स घेऊन निघून गेली. जेव्हा सुशांतला एकटेपणा जाणवत होता, तेव्हा रियाने त्याचा फोन नंबर ब्लॉक केला होता.

 • मुंबई पोलिसांवरही तपास दुस-या दिशेला नेत असल्याचा आरोप आहे

विकास यांनी स्पष्ट केले की, सुशांतच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला होता. या धक्क्यातून सावरायला त्यांना बराच काळ लागला. मुंबई पोलिस त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे तक्रार दाखल करायला दीड महिना लागला. त्यांनी सांगितले की, मुंबई पोलिस सुशांतच्या कुटुंबावर मोठमोठ्या प्रॉडक्शन हाऊसचा उल्लेख करण्याचा दबाव आणत आहेत. मुंबई पोलिस हा तपास दुसर्‍या दिशेने नेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

 • पाटणा पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी कुटुंबीयांची इच्छा

विकास यांनी सांगितल्यानुसार, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी पाटणा पोलिसांनी करावी, अशी सुशांतच्या कुटुंबीयांची इच्छा आहे. सोबतच पाटणा पोलिसांनाही याप्रकरणी काही अडचणी आल्याचे त्यांनी सांगितले. विकास यांनी बिहारच्या मुख्यमंत्र्यांचे आभार देखील मानले आहेत. त्यांच्या सांगण्यावरुन तक्रार दाखल झाल्याचे विकास यांनी संकेत दिले.

 • बिहार पोलिसांनी रियाला चौकशीची नोटीस पाठवली नाही

पाटणा सिटीचे एसपी विनय तिवारी म्हणाले - एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. कुणाकुणाची चौकशी केली जाईल हे अद्याप सांगता येणार नाही. सुशांतच्या वडिलांनीसुद्धा तक्रार दाखल केली आहे. अद्याप कोणालाही चौकशीची नोटीस देण्यात आलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 • या कलमांखाली गुन्हा दाखल

सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीवरून पाटण्याच्याराजीव नगर पोलिसांनी सहा जणांवर भांदवी कलम 341, 342, 280, 420, 406, 420 आणि 306 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एलजेपी नेते चिराग पासवान यांनीही या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सुशांतच्या वडिलांनी उपस्थित केले हे 7 प्रश्न

 • 2019 पूर्वीपर्यंत सुशांतला कोणताही मानसिक आजार नव्हता. रियाच्या संपर्कात आल्यावर अचानक मानसिक आजार कसा झाला?
 • जर तो उपचार घेत असेल तर मग आमच्याकडून लेखी किंवा तोंडी मान्यता का घेतली गेली नाही, जी आवश्यक असते?
 • सुशांतवर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी कोणती औषधे दिली होती, ते देखील या कटात सामील आहेत का?
 • सुशांतची मानसिक स्थिती गंभीर असताना रियाने त्याला योग्य वागणूक का दिली नाही, ती त्याचे मेडिकल कागदपत्रं आपल्यासोबत का घेऊन गेली?
 • सुशांतच्या बँक खात्यात 17 कोटी रुपये होते, त्यापैकी एका वर्षामध्ये सुमारे 15 कोटी रुपये काढण्यात आले, हे पैसे कोणत्या बँक खात्यात जमा झाले?
 • सुशांतने बॉलिवूडमध्ये नाव कमावले होते. मग अचानक असे काय झाले की रियाच्या येणा-यानंतर त्याला चित्रपट मिळणे बंद झाले?
 • सुशांत त्याचा मित्र महेशसोबत मिळून केरळमध्ये ऑर्गेनिक शेतीसाठी जमीन पाहात होता, तेव्हा रियाने त्याला ब्लॅकमेल केले?