आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत आत्महत्या प्रकरण:मुंबई पोलिसांनी कुकची पुन्हा 6 तास चौकशी केली; बहिणीलाही पुन्हा पोलिस ठाण्यात बोलविण्यात आले

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतचा जवळचा मित्र आणि दिग्दर्शक मुकेश छाबरा यांनी सुशांतची आठवण काढत त्याच्यासोबतची बरीच छायाचित्रे शेअर केली आहेत.
  • पोलिस सुशांतच्या बहिणीकडे दोघांत झालेले संभाषण आणि मैत्रीण रियाविषयी चौकशी करु शकतात.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला आज एक महिना पूर्ण झाला आहे. 14 जून रोजी मुंबईच्या वांद्रे येथील राहत्या घरी सुशांतने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. बरेच दिवस उलटले तरी मुंबई पोलिसांना सुशांतच्या आत्महत्येमागील खरे कारण समजू शकलेले नाही.

दरम्यान, सोमवारी मुंबई पोलिसांनी सुशांतच्याचा कुक नीरजची सहा तास चौकशी केली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी नीरजकडून सुशांतच्या आत्महत्येच्या 3 दिवस आधी काय काय घडले होते, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 11 जून ते 14 जून या काळात सुशांतने काय खाल्ले, कोण त्याला भेटायला आले होते यासारख्या प्रत्येक लहानसहान गोष्टीची पोलिसांनी माहिती करुन घेतली.  

  • सुशांतच्या बहिणीला पुन्हा चौकशीसाठी बोलावले

सुशांतची मोठी बहीण मीतू यांनाही मंगळवारी पुन्हा चौकशीसाठी बोलविण्यात आले. सुत्रांच्या माहितीनुसार, पोलिस बहीणभावातील संभाषणासोबतच सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीबद्दल चौकशी करू शकतात.

  • मुकेश छाबराने केले सुशांतचे स्मरण

सुशांतचा जवळचा मित्र आणि दिग्दर्शक मुकेश छाबडा यांनी आज सुशांतसोबतची बरीच छायाचित्रे शेअर केली आहे. यात त्यांनी लिहिले- 'आज 1 महिना झाला आहे. आता तू मला कॉलदेखील करणार नाही.'  याशिवाय सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिनेदेखील सुशांतच्या स्मृतीप्रित्यर्थ घरातील देवा-यात दिवा लावला. याचा फोटो शेअर करुन अंकिताने लिहिले 'चाइल्ड ऑफ गॉड', असे कॅप्शनमध्ये लिहिले. सोबतच सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिनेदेखील एका पोस्टच्या माध्यमातून महिन्याभरानंतर आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.