आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत आत्महत्या प्रकरणी पाटण्यात गुन्हा दाखल:वडिलांनी काही सेलिब्रिटींवर सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा लावला आरोप, म्हणाले - गर्लफ्रेंड रियाने सुशांतच्या खात्यातून 17 कोटी रुपये काढले

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिहार पोलिसांच्या टीमने याप्रकरणी मुंबईतील एका मोठ्या अधिका-यासोबत बातचीत केली असून सुशांतच्या केस डायरीची प्रत देण्याची विनंती केली आहे.
  • मिळालेल्या माहितीनुसार, पाटणा पोलिसांचे एसएसपी उपेंद्र शर्मा यांनी पथक तयार करून चार पोलिस अधिका-यांना मुंबईला पाठवले आहे.

चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. सुशांतचे वडील केके सिंह यांनी पाटण्यातील राजीव नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. केके सिंह यांनी काही सेलिब्रिटींवर सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. मात्र, त्यांनी आरोपींची नावे घेतली नाहीत. यासोबतच केके सिंह यांनी सुशांतच्या बँक खात्यातून 17 कोटी रुपये काढण्यात आल्याचे म्हटले आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रियावर पैसे काढल्याचा आरोप आहे.

सुशांतच्या वडिलांनी पोलिसांना बरीच महत्वाची माहिती दिली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. पोलिसांनी भादंवि कलम 341, 342, 380, 406, 420 आणि 3.6 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. एसएसपी उपेंद्र शर्मा यांनी चार पोलिस अधिका-यांची एत टीम तपासासाठी मुंबईला पाठविली आहे. हे चार पोलिस अधिकारी मुंबईत पोहोचले आहेत. मुंबई पोलिसांच्या मदतीने या प्रकरणाचा तपास केला जाईल.

  • मुंबईत पोहोचले बिहार पोलिस

पाटण्यात एफआयआर दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांची 4 सदस्यांची टीम मुंबईत पोहोचली आहे. या पथकाने मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिका-यांशीही संवाद साधला असून सुशांतच्या केस डायरीची प्रत उपलब्ध करुन देण्याची विनंती केली आहे.

  • सुशांतने 14 जून रोजी मुंबईत आत्महत्या केली

14 जून रोजी सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यामागील मुख्य कारण डिप्रेशन असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सुशांतच्या कुटुंबीयांनी पोलिस अधिका-यांना दिलेल्या निवेदनानुसार तो डिप्रेशनमध्ये नव्हता. ते सुशांतबरोबर रोज बोलायचे. त्याच्या वागण्यावरुन तो तणावात असल्याचे कधीही जाणवले नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर सीबीआय चौकशीची मागणी सातत्याने होत आहे.

  • मुंबई पोलिस सातत्याने तपास करत आहेत

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा मुंबई पोलिस सातत्याने तपास करत आहे. या प्रकरणात धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांची मंगळवारी चौकशी करण्यात आली. यापूर्वी सोमवारी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात महेश भट्ट यांची सुमारे दोन तास चौकशी केली गेली. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी अभिनेत्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. सोमवारी त्यांनी आपल्या मागणीसंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र सोपवले.

  • आतापर्यंत 39 जणांचे जबाब नोंदवण्यात आले

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितल्यानुसार, मुंबई पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात 39 जणांचे जबाब नोंदविले आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी वांद्रे येथील घरी आत्महत्या केली. घरातून कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. पण काही लोकांचा असा आरोप होता की, तो आउटसाइडर असल्याने काही लोक त्याचे करिअर उद्ध्वस्त करत आहेत आणि यामुळे त्याने आत्महत्या केली.