आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत आत्महत्या प्रकरण:'दिल बेचारा'ची अभिनेत्री संजना सांघीची वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये चौकशी सुरू, मुंबई पोलिसांनी ट्विटर इंडियाकडून तपशील मागितला 

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संजनाला सोमवारी पोलिसांनी समन्स बजावले होते, पण दिल्लीत असल्याने ती काल येऊ शकली नव्हती.
  • ‘मी-टू कॅम्पेन’ दरम्यान संजनाने सुशांत सिंह राजपूतवर विनयभंगाचा आरोप लावला होता, अशीही चर्चा आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आपला जबाब नोंदवण्यासाठी 'दिल बेचारा'मधील अभिनेत्री संजना सांघी मंगळवारी वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली.  खरं तर संजनाला सोमवारी पोलिसांनी समन्स बजावले होते, पण ती दिल्लीत असल्याने काल हजर राहू शकली नव्हती. दिल बेचारा हा सुशांतचा शेवटचा चित्रपट आहे. 

काही काळापूर्वी 'मी-टू कॅम्पेन' दरम्यान संजनाने सुशांत सिंह राजपूतवर विनयभंग केल्याचा आरोप केला होता, अशीही चर्चा आहे. संजनाची चौकशी हा एक मोठा दुवा सिद्ध होऊ शकते. असे म्हटले जाते की, सुशांत तेव्हापासूनच निराश राहू लागला होता.