आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

का हरला सुशांत:खरंच भन्साळींनी सुशांत सिंह राजपूतकडून चित्रपट काढून घेतले होते आणि करण-यशराज-साजिद-एकता यांनी त्याला बॅन केले होते?

मुंबई2 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • आज पहिला रिपोर्ट - सुशांतला चित्रपट मिळणे, काढून घेण्याची संपूर्ण कहाणी
 • सर्वात मोठा आरोप हा आहे की, सुशांतला 7 चित्रपटांची ऑफर मिळाली होती, पण 6 त्याच्याकडून काढून घेण्यात आले.
 • करण जोहरने आपला फोन नंबर बदलला आणि आलिया भट्टसह अनेक मित्रांना सोशल मीडियावर अनफॉलो केले.

34 वर्षीय अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या का केली? सुशांत डिप्रेशनमध्ये होता की त्याला काही लोकांनी आत्महत्या करण्यास भाग पाडले? या कोड्याची उकल करण्यासाठी मुंबई पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे.

सुशांतचे कुटुंबीय आणि शुभचिंतकांनुसार तो आत्महत्या करणाऱ्यांपैकी नव्हता, त्याला असे करण्यास भाग पाडण्यात आले. आता सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी ऑनलाईन पिटिशन सुरु असून खटलाही दाखल करण्यात आला आहे. 

काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी सर्वात पहिले सुशांतकडून चित्रपट काढून घेण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख, मंत्री जितेंद्र आव्हाड, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनीही विविध मुद्दे मांडले. या सर्वांमध्ये दिव्य मराठी टीमने या सर्व प्रकरणाचा घटनाक्रम, दावे, इंडस्ट्रीतील जाणकार आणि सुशांतच्या जवळील लोकांशी चर्चा करून एक रिपोर्ट तयार केला आहे.

 • आज पहिला रिपोर्ट - सुशांतला चित्रपट मिळणे, काढून घेण्याची संपूर्ण कहाणी
 • परंतु सर्वात पहिले घटनाक्रम 3 पॉईंटमध्ये

1. 14 जूनचे ते 5 तास, सुशांत सकाळी 9:30 वाजता ज्यूस पिऊन आपल्या खोलीत गेला, दरवाजा बंद केला आणि पुन्हा बाहेर आला नाही. दुपारी अडीच वाजता सुशांत सिंह राजपूतने फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी समोर आली. त्यानंतर सुशांत सहा महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये असल्याचे समोर आले. त्याने औषधी घेणेही बंद केले होते. 15 जूनला मुंबईत अंत्यसंस्कार झाले आणि 18 जूनला पटना येथे अस्थी विसर्जन करण्यात आले.

2. 15 जूनपासून तपास सुरु झाला. पोलिसांनी मॅनेजर, नोकराव्यतिरिक्त सुशांतची जवळची मैत्रीण रिया चक्रवर्तीची 11 तास चौकशी केली. यशराज फिल्म्ससोबत सुशांतच्या झालेल्या कॉन्ट्रेक्ट कॉपी मागवण्यात आल्या. तपास एवढा फास्ट सुरु आहे की, करण जोहरने आपला फोन नंबर बदलून आलिया भट्टसहित जवळपास सर्व मित्रांना अनफॉलो केले.

3. 15 जूनपासूनच वेगवेगळे वक्तव्य सुरु, बॉलिवूडमध्ये सुशांतच्या बाजूने कंगना रनोट, अभय देओल, शेखर कपूर, अनुभव कश्यप, कोयना मित्रा, रविना टंडन यासारख्या सेलेब्सनी समोर येऊन आपले रोखठोक मत मांडले. करण जोहर, आदित्य चोप्रा, संजय लीला भन्साळी, सलमान आणि साजिद नाडियादवाला यासारख्या लोकांना जबाबदार ठरवण्यात आले.

 • पहिला आरोपः यशराज आणि भन्साळी ज्यांचे चित्रपट सुशांतने सोडले

आदित्य चोप्रा यांच्या यशराज फिल्म्सने सुशांत सिंह राजपूतसोबत तीन चित्रपटांचा करार केला होता. यामध्ये ब्योमकेश बख्शी, शुद्ध देसी रोमांस आणि शेखर कपूर यांच्या पानी या चित्रपटांचा समावेश होता. परंतु, खरी समस्या शेखर कपूर यांच्या चित्रपटानंतर सुरू झाली. शेखर कपूर यांनी हा चित्रपट आधी हॉलिवूडसाठी बनवण्याचे ठरवले होते. परंतु, नंतर ठरले की ते भारतासाठी बनवले जाईल. मात्र, चित्रपटाचे बजेट खूप वाढल्याने यशराजने आपला हात आखडता घेतला. येथूनच सुशांत आणि यशराजचे संबंध बिघडले.

 • दुसरा आरोप: यशराजने पॉवर वापरून सुशांतच्या जागी रणवीरला घेतले

फिल्म इंडस्ट्रीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पानी चित्रपटासाठी सुशांतने आपले इतर अनेक चित्रपट नकारले होते. पण, पानी चित्रपट रद्द झाल्यानंतर सुशांतने दुसऱ्या प्रोजेक्ट्सवर काम करण्यास सुरुवात केली. त्याने 'गोलियों की रासलीला- राम-लीला' आणि 'बाजीराव मस्तानी' अशा मोठ्या चित्रपटांसाठी सुद्धा संजय लीला भन्साळी यांच्यासोबत करार केला होता. पण, आरोप आहे की यशराजने आपल्या इंडस्ट्रीतील दबावतंत्राचा वापर करून सुशांतला चित्रपटांमधून बाहेर काढले. यानंतर करण जोहर सोबत मिळून सुशांतला धर्मा प्रॉडक्शना चित्रपट ड्राइव्ह देण्यात आला. पण, दोन वर्षे हा चित्रपट रिलीज होऊ दिला नाही. चित्रपटाच्या क्वॉलिटिवर सध्या काम सुरू आहे अशी कारणे देण्यात आली. अखेर दोन वर्षांनंतर हा चित्रपट नेटफ्लिक्सला विकण्यात आला.

 • तिसरा आरोप: करणने बाजूला सारले, साजिदने छिछोरेनंतर कामच दिले नाही

अॅक्शन थ्रिलर चित्रपट ड्राइव्ह लटकल्यानंतर सुशांतने करण जोहरला विरोध करण्यास सुरुवात केली. यानंतर जोपर्यंत चित्रपटाच्या रिलीजची तारीख निश्चित होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रोड्युसरसोबत काम करणार नाही असे सुशांतने ठरवल्याचे वृत्त होते. यावर करण जोहरचा अहम दुखावला गेला. त्यानंतर कथितरित्या सुशांतला इतर मोठ्या प्रोजेक्ट्समधून बाहेर काढण्यास सुरुवात झाली. त्याला बॉलिवूडच्या पार्ट्या आणि पुरस्कार समारंभांमध्ये बोलावले जात नव्हते. त्याला एकटे पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. विविध कार्यक्रमांमध्ये मोठ्या अभिनेत्यांकडून त्याला लज्जित करण्याचे काम सुरू झाले. कंगनाने यासंदर्भात आलिया भट्टला सुनावले देखील आहे.

त्यात साजिद नाडियाडवालाने आगीत तेल ओतण्याचे काम केले. साजिद आणि सुशांतचा चित्रपट छिछोरे हिट झाला. 153 कोटी रुपयांची कमाई सुद्धा केली. परंतु, यानंतर साजिदने सुशांतसोबत एकही चित्रपट साइन करून घेतला नाही. अशाच पद्धतीने यशराज, करण जोहर आणि त्यानंतर साजिदने आपल्या यादीतून बाहेर केले आणि सुशांत नैराश्यात गेला असे सांगितले जाते.

 • कमाल खानची ब्रेकिंग : सुशांतला मोठ्या प्रॉडक्शन हाऊसने बॅन केले

छिछोरे चित्रपट 2019 च्या शेवटी आला होता आणि त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये सुशांतला मोठ्या प्रॉडक्शन हाऊसने बॅन केल्याची बातमी समोर आली. हीच बातमी फेब्रुवारी 2020 मध्ये मोठ्या प्रकरणात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कमाल आर खानच्या ट्विटर हॅण्डलवर ट्विट करण्यात आली होती.

दैनिक भास्करच्या मुलाखतीमध्ये कमाल खाननेही दबक्या स्वरात इशारा केला की, 'जर मी त्यांना (सुशांत) बॅन केल्याची बातमी ब्रेक केली होती तर मग त्यानंतर कोणीच काही का केले नाही? याचा अर्थ त्यांना बॅन करण्यासारखे नक्की काहीतरी होते, परंतु इंडस्ट्रीमध्ये अशा गोष्टी समोर येतात कुठे, सर्वकाही आतल्याआत चालू राहते.'

 • शेवटी रुमी जाफरीचा चित्रपट लॉकडाऊनमध्ये अडकला

इंडस्ट्रीमध्ये चालू असलेल्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत सुशांतने बाउंस बॅक करण्याचा प्रयत्न केला होता. त्याने डायरेक्टर रुमी जाफरी यांचा चित्रपट या वर्षी साइन केला होता आणि मे महिन्यात शुटींग सुरु होणार होते परंतु लॉकडाऊनमुळे डेस्ट्स वाढत गेल्या.

रुमी सांगतात- 'सुशांतने एकदा मला सांगितले होते की, आता तो चित्रपटात काम करू इच्छित नाही. त्याला अभिनय सोडायचा होता. त्याला शेती करायची होती. संपूर्ण देशात एक लाखापेक्षा जास्त झाडे लावण्याची त्याची इच्छा होती. वैज्ञानिकाप्रमाणे नवीन गोष्टींचा अविष्कार करण्याची त्याची इच्छा होती.'

8 जूनला सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सिलियनच्या आत्महत्येची बातमी ऐकून रुमी यांनी 12 जूनला सुशांतला फोन केला होता. रुमी म्हणाले- 'मी सुशांतला स्वतःकडे लक्ष दे असे सांगितले होते आणि त्यानेही मला एक व्हाईस नोट पाठवून हो मी स्वतःची काळजी घेऊन असे सांगिलते होते.' पुढे रुमी म्हणाले 'मला अजिबात या गोष्टीचा अंदाज नव्हता की सुशांत एवढे टोकाचे पाऊल उचलेल आणि आपल्या सर्वांना सोडून जाईल.'

 • एकता कपूर संतापली, लिहिले - माझ्यावर केस केल्याबद्दल धन्यवाद

17 जून रोजी बिहारमध्ये सुधीर कुमार ओझा नावाच्या एका सुशांतच्या बाजूने खटला दाखल केला. यात एकता कपूर, संजय लीला भन्साळी, करण जोहर, सलमान खान यांच्यासह 8 जणांविरोधात सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. 11 वर्षांपूर्वी सुशांतला पवित्र रिश्ता या मालिकेतून ब्रेक देणारी एकता यावरुन चिडली आहे. 

एकताने स्वतः पोस्ट केले होते की 'सुशाला कास्ट न केल्याबद्दल खटला केल्याने धन्यवाद. प्रत्यक्षात मी त्याला लाँच केले आहे. लोक गोष्टी किती गुंतागुंतीच्या बनवतात याबद्दल मला वाईट वाटण्यापेक्षा अधिक वाईट वाटते. कृपया कुटुंब आणि मित्रांना शांततेत शोक व्यक्त करु द्या.'

19 जून रोजी, चित्रपट दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी आणखी एक मोठा खुलासा केला. त्यांनी सुशांतला 2012 मध्ये आलेल्या 'हेट स्टोरी' या चित्रपटात साइन केले होते, जो त्याचा पहिला चित्रपट असू शकला असता, पण एकता कपूरने त्याला पवित्र रिश्ता या मालिकेतून सोडले नव्हते. त्यामुळे तो चित्रपट करु शकला नव्हता.  

 • भन्साळी यांचे स्पष्टीकरण - 4 चित्रपट ऑफर केले होते, पण तारखांमुळे बनू शकले नाहीत

सुशांत प्रकरणात भन्साळींच्या वतीने असे म्हटले गेले की, त्यांच्यात आणि सुशांतमध्ये कोणताही संघर्ष नव्हता. भन्साळींनी त्याला चार चित्रपटांची ऑफर दिली होती, परंतु तारखांमुळे त्याला चित्रपट करता आले नाहीत. दोघांमध्ये खूप आदर होता. भन्साळींवर करणी सेनेने हल्ला केला तेव्हा सुशांतने त्याचे राजपूत आडनाव ड्रॉप केले होते.

 • करण जोहरने भावनिक पोस्ट करुन मागितली होती माफी, 5 दिवसांपासून काहीही लिहिले नाही

यशराज फिल्म्सने महत्त्वाचे कॉन्ट्रॅक्ट डॉक्युमेंट्स पोलिसांच्या स्वाधीन केले आहेत, परंतु या प्रकरणी मौन बाळगले आहे. करण जोहरने आपला राग सोशल मीडियावर नव्हे तर मित्रांना अनफॉलो करुन व्यक्त केला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर करण जोहरने त्यांच्यासोबतचे एक छायाचित्र पोस्ट केले होते.    'मी गेल्या एक वर्षापासून तुझ्याशी संपर्कात नव्हतो यासाठी मी स्वत: ला जबाबदार धरत आहे. मला बर्‍याच वेळा असे वाटले आहे की, तुला कुणाची तरी गरज आहे, ज्याच्यासोबत तू बोलू शकतो. परंतु कदाचित मी असा विचार केला नाही. आम्ही बर्‍याचदा गर्दीत आपले आयुष्य जगतो पण आतून एकटे असतो.'

 • आरोपः महेश भट्ट यांनी रियाला सुशांतपासून दूर केले

निर्माते-दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यासोबत काम करणा-या लेखिका सुहृता सेनगुप्ता यांनी खळबळजनक खुलासा करताना सांगितले की, महेश भट्ट यांनी सुशांतची बिघडलेली मानसिक स्थिती बघून तो परवीन बॉबीसारखा बनत असल्याचे म्हटले होते. महेश यांनी सुशांतची कथिक गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला त्याच्यापासून वेगळे होण्याचा सल्ला दिला होता. 

पत्रकार सुभाष के. झांच्या वृत्तानुसार, सुहृताने सांगितले की, सुशांत महेश भट्ट यांच्याकडे सडक -2 मधील भूमिकेची शक्यता शोधण्यासाठी आला होता. मागील वर्षभरापासून सुशांतने बाह्य जगातून स्वत: ला पूर्णपणे दूर केले होते. एक वेळ अशी आली होती की, सुशांतला आवाज ऐकू येत होते. त्याला असे वाटू लागले होते कीस लोक त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करत आहेत.

एके दिवशी सुशांत त्याच्या घरी अनुराग कश्यपचा चित्रपट बघत होता आणि त्याने रियाला सांगितले - “मी कश्यपला एका प्रोजेक्टसाठी नकार दिला. आता तो मला मारायला येणार आहे.' या घटनेनंतरच सुशांतसोबत राहण्याची रियाला भीती वाटत होती. रियाने त्याच्यासोबतचे संबंध तोडले.

महेश भट्ट यांनी तिला सांगितले की, आता तू काही करु शकत नाहीस. रियाने त्याची बहीण मुंबईत येईपर्यंत त्याला सांभाळण्याचा प्रय़त्न केला, पण तो कुणाचेही ऐकायला तयार नव्हता.

 • 11 जून रोजीच सुशांत आत्महत्येच्या मार्गावर निघाला होता

इंडस्ट्रीतील टीकाकार आणि समीक्षक या सर्व मोठ्या नावांनी दिलेले स्पष्टीकरण नाकारतात. त्यांच्या मते, यशराजच्या मालकाच्या सांगण्यावरुनच भन्साळींनी त्याला आपल्या चार चित्रपटातून काढून टाकले होते. 

यानंतर उर्वरित काम करण जोहर आणि साजिद नाडियाडवाला यांनी केले. सुशांत कित्येक महिने सर्व काही पहात राहिला, सर्वकाही सहन करत राहिला आणि आतून पुरता कोलमडून गेला. अखेर छिछोरेनंतर त्याने शरणागती पत्करली.

  चित्रपटात काम करण्याची त्याची इच्छा मेली. नैराश्य वाढले आणि कौटुंबिक जीवनासोबत लव लाइफही रुळावरुन घसरु लागली. शेवटी, जेव्हा भावनिक आधार मिळाला नाही, तेव्हा त्याने आत्महत्येचा विचार केला  14 जून रोजी दुपारी त्याने या मार्गाचा अवलंब केला.

यामागील तर्क म्हणजे 11 जूनपासूनच यासाठीची तयारी त्याने केली होती. त्याने त्याच्यासोबत काम करणा-या सर्व सदस्यांना 11 जून रोजी पगार दिला आणि यापुढे पैसे देणे शक्य होणार नसल्याचे त्यांना सांगितले होते.   

 • सुशांतचा 12 वर्षांचा प्रवास: 2008 ते 2020
 • बिहारहून दिल्लीत टेक्नॉलॉडी युनिव्हर्सिटीत इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या सुशांतने शामक दावर यांच्या डान्स क्लासमध्ये प्रवेश घेतला होता. तेथून मित्रांच्या माध्यमातून त्याची अभिनयातील रुची वाढली आणि सुशांत बॅरी जॉनच्या ड्रामा क्लासमध्ये जाऊ लागला.
 • 2005 मध्ये त्याला फिल्मफेअर पुरस्कारांसाठी शामक दावरच्या डान्स ट्रूपमध्ये सामील होण्याची संधी मिळाली. काही दिवसांनी सुशांतने अभियांत्रिकी सोडून अभिनयात करियर करण्याचा निर्णय घेतला. तो मुंबईत आला आणि नादिरा बब्बर यांच्या थिएटर ग्रुप 'एकजुट' मध्ये सामील झाला.
 • 'एकजुट'च्या या एकाच नाटकात काम करत असताना, बालाजी टेलीफिल्म्सच्या कास्टिंग टीमने त्यांना 2008 मध्ये टीव्ही सीरियल 'किस देश में है मेरा दिल'मध्ये काम करण्याची ऑफर दिली. 2009 मध्ये त्याला 'पवित्र रिश्ता' या मालिकेत लीड रोल मिळाला आणि याबरोबरच तो प्रसिद्धीझोतात झाला. सुशांतने 'जरा नचके दिखा' आणि 'झलक दिखला जा' या रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला.
 • 2012 मध्ये अभिषेक कपूरच्या 'काय पो चे'च्या ऑडिशनसाठी सुशांतची निवड झाली आणि येथूनच त्याच्या करियरची सुरुवात मोठ्या पडद्यावर झाली. राजकुमार राव आणि अमित साध यांच्यासमवेत सुशांतची जोडी चांगलीच गाजली होती.
 • त्यानंतर 2013 मध्ये ‘शुद्ध देसी रोमान्स’ या यशराज बॅनर चित्रपटात तो मुख्य अभिनेता होता. त्यानंतर लगेचच म्हणजे 2014 मध्ये त्याला राजकुमार हिरानी यांच्या ‘पीके’ या चित्रपटात आमिर खानसोबत काम करण्याची संधी मिळाली.
 • 2015 मध्ये दिबाकर बॅनर्जी यांच्या 'डिटेक्टिव्ह' व्योमकेश बक्षी'मध्ये त्याने काम केले होते. 2016 मध्ये तो एम एस धोनीच्या बायोपिक द अनटोल्ड स्टोरीमध्ये धोनीच्या भूमिकेत झळकला होता.
 • 2017 मध्ये 'राब्ता'नंतर, तो 2018 मध्ये सारा अली खानसोबत 'केदारनाथ'मध्ये दिसला होता.
 • 2019 मध्ये इरफान आणि भूमी पेडणेकर यांच्यासोबत त्याने 'सोनचिरैया'मध्ये काम केले होते. 2017 मध्ये पहिल्यांदाच त्याला धोनीच्या बायोपिकसाठी फिल्मफेअरमध्ये नामांकन मिळाले होते. यानंतर, 2019 मधील 'छिछोरे' हा सुशांत सिंह राजपूतच्या कारकीर्दीचा सर्वोत्कृष्ट आणि शेवटचा चित्रपट होता.
बातम्या आणखी आहेत...