आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांतचा व्हिसेरा रिपोर्ट:शरीरात कोणतेही संशयित रसायन नव्हते, विष सापडले नाही; मृत्यूपूर्वी झटापटीच्या खुणाही मिळाल्या नाहीत

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शवविच्छेदनानंतर व्हिसेरा मुंबईतील जे. जे. रुग्णालयात विश्लेषणासाठी पाठविण्यात आले.
  • शवविच्छेदन अहवालात सुशांतच्या मृत्यूचे कारण एस्फिक्सिया (शरीराला पुरेसे ऑक्सिजन न मिळणे) सांगितले गेले.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या शवविच्छेदन अहवालानंतर आता त्याचा अंतिम व्हिसेरा रिपोर्ट मंगळवारी संध्याकाळी समोर आला आहे. त्याचा मृत्यूमागे संशयास्पद कारण नसल्याचे यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. सुशांतच्या शरीरात कोणत्याही प्रकारचे संशयित रसायन किंवा विषारी पदार्थ आढळून आला नाही.पोस्टमॉर्टमनंतर व्हिसेरा मुंबईतील जे.जे. रुग्णालयात विश्लेषणासाठी पाठवण्यात आले होते. ही आत्महत्येची घटना असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

  • कोणतेही संशयित रसायन, विष सापडले नाही

व्हिसेरा रिपोर्टमध्ये सांगितल्यानुसार, 'मृत्यूच्या आधी कोणत्याही संघर्षाचे किंवा झटापटीचे संकेत मिळालेले नाहीत. तसेच सुशांतच्या नखांमध्येही काहीच आढळून आलेलं नाही.'

सुशांत सिंहचा अंतिम शवविच्छेदन अहवाल गेल्या आठवड्यात आला होता. त्यामध्ये सांगितले होते की, सुशांतचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे श्वास गुदमरून झाला होता. पोस्टमॉर्टम रिपोर्ट पाच डॉक्टरांच्या टीमने तयार केला होता.

  • प्राथमिक शवविच्छेदन अहवाल 14 जून रोजी आला होता

याआधी आलेल्या प्रोव्हिजन पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही सुशांतचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे श्वास गुदमरून झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या अवयवांना सविस्तर अहवालासाठी जेजे रुग्णालयात पाठविण्यात आले होते. या सविस्तर अहवालात सुशांतचा मृत्यू गळफास घेतल्याने झाल्याचे समोर आले आहे. त्याचा प्रोव्हिजन पोस्टमॉर्टम रिपोर्ट तीन डॉक्टरांच्या टीमने बनवला होता.

0