आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत आत्महत्या प्रकरण:दिग्दर्शक महेश भट्ट यांची वांद्रे पोलिस ठाण्यात काही वेळात होईल चौकशी, अभिनेत्री कंगना रनोटने केले आहेत अनेक आरोप

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनिल देशमुख यांनी या प्रकरणात करण जोहरच्या मॅनेजरला प्रश्न विचारले जाणार असल्याचे म्हटले आहे.
  • पोलिस या प्रकरणात व्यवसायातील वैमनस्याच्या पैलूंवरही चौकशी करत आहेत आणि त्यांनी 37 जणांचे जबाब नोंदवले आहेत.
Advertisement
Advertisement

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांनी चित्रपट दिग्दर्शक-निर्माते महेश भट्ट यांना वांद्रे पोलिस ठाण्यात दुपारी 12 वाजेपर्यंत चौकशीसाठी बोलावले आहे. लवकरच ते वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये पोहोचतील अशी अपेक्षा आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महेश भट्ट हे आपल्या घरातून वांद्रे पोलिस स्टेशनकडे रवाना झाले आहेत.

  • धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांचीही चौकशी केली जाईल

रविवारी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले होते की, सुशांत आत्महत्या प्रकरणात महेश भट्ट आणि करण जोहरच्या मॅनेजरची चौकशी केली जाईल. पण नंतर असे सांगितले गेले की, करणच्या मॅनेजरला नव्हे तर धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलविण्यात आले आहे.

अनिल देशमुख यांनी असेही म्हटले आहे की, या प्रकरणात गरज भासल्यास करण जोहरला देखील जबाब नोंदवण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये यावे लागेल.

  • व्यावसायिक वैमनस्याचा आरोप कंगनाने केला आहे

पोलिस या प्रकरणात व्यवसायातील वैमनस्याच्या पैलूंवरही चौकशी करत आहेत. काही लोकांनी गटबाजी करुन ठेवली आहे आणि बाहेरच्या लोकांना इंडस्ट्रीत प्रवेश करू दिला जात नसल्याचा आरोप कंगनाने केला होता. देशमुख म्हणाले की, पोलिस या आरोपांचाही शोध घेत आहेत आणि गरज पडेल अशा सर्व जणांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावले जाईल.

  • आतापर्यंत 37 लोकांचे जबाब नोंदवले गेले आहेत

देशमुख म्हणाले की, मुंबई पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 37 जणांचे जबाब नोंदवले आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी वांद्रेच्या घरात आत्महत्या केली. घरातून पोलिसांना सुसाइड नोट सापडली नाही, परंतु आऊटसाइडर असल्याने काही लोकांनी त्याचे करिअर उद्धवस्त केले, त्याला कंटाळून सुशांतने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा आहे.

  • महेश भट्ट आणि करण जोहर सतत ट्रोल होत आहेत

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात महेश भट्ट आणि करण जोहर सातत्याने ट्रोल होत आहेत. करण जोहर वर सुशांतचे करिअर खराब केल्याच्या आरोप लावला जात आहे. आलिया भट्ट, सोनम कपूर, सोनाक्षी सिन्हा यांच्यासह अनेक स्टार किड्ससुद्धा या प्रकरणी ट्रोल होत आहेत.

Advertisement
0