आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत आत्महत्या प्रकरण:जवळजवळ दीड महिन्यांनी आला महत्त्वाचा फॉरेन्सिक रिपोर्ट, मृत्यूमागे संशयास्पद कारण असण्याची शक्यता फेटाळली

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या प्रकरणात 'स्टमक वॉश' आणि नखांच्या नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे.
  • यापूर्वी आलेल्या सुशांतच्या अंतिम शवविच्छेदन अहवालात त्याचा मृत्यू गळफास घेतल्याने झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या जवळपास दीड महिन्यानंतर पोलिसांना त्याचा फॉरेन्सिक व्हिसेरा अहवाल मिळाला आहे. हा अहवाल सोमवारी सकाळी वांद्रे पोलिसांना कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून देण्यात आला. सुशांतच्या मृत्यूमागे कुठलाही घातपात किंवा इतर संशयास्पद कारण असण्याची शक्यता त्यामुळे फेटाळली गेली आहे. सुशांतने स्वतःच्या राहत्या घरी छताला लटकून गळफास घेतल्याचे या व्हिसेरा अहवालामुळे उघड झाले आहे.

  • नखांच्या नमुन्यांचा अहवाल येणे बाकी

सुशांतच्या शवविच्छेदनानंतर व्हिसेरा अहवालाची पोलिस वाट पाहात होते. ही आत्महत्या आहे आहे की घातपात आहे याची खात्री करण्याच्या दृष्टीने व्हिसेरा रिपोर्ट महत्त्वाचा होता. अजूनही काही महत्त्वाचे मेडिकल फॉरेन्सिक रिपोर्ट बाकी असल्याचे मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे. सुशांतच्या नखांच्या नमुन्यांचे परीक्षण आणि स्टमक वॉश म्हणजे पोटात नेमके काय गेले याचा छडा लावणारा अहवाल अद्याप आलेला नाही. यापूर्वी आलेल्या शवविच्छेदन अहवालात सुशांतचा मृत्यू गळफास घेऊन श्वास गुदमरल्याने झाल्याचे स्पष्ट झाले.

  • आतापर्यंत 38 लोकांची चौकशी करण्यात आली आहे

या प्रकरणात आतापर्यंत 38 लोकांची चौकशी करण्यात आली आहे. सोमवारी (27 जुलै) चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुंबई पोलिसांनी दोन तास चौकशी केली आहे. आता मंगळवारी धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व यांची चौकशी केली जाईल. यापूर्वी, सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती, कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाबडा, यशराज फिल्मचे आदित्य चोप्रा, कास्टिंग दिग्दर्शक शानू शर्मा, चित्रपट समीक्षक राजीव मसंदसह अनेक बॉलिवूड कलाकारांची चौकशी पोलिसांनी केली आहे.गरज पडल्यास करण जोहरलाही चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. तसंच कंगना रनोटचीही याप्रकरणी चौकशी केली जाणार आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर कंगनाने बॉलिवूडमधील घराणेशाही, गटबाजीवर अनेक वक्तव्ये केली आहेत.