आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत आत्महत्या प्रकरण:दिशा सालियनसोबत सुरु होती 14 कोटींच्या वेब सीरिजविषयीची बोलणी, मार्च महिन्यात दोनदा झाली होती चर्चा 

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मिड डेच्या वृत्तानुसार, सुशांतने आपल्या कर्मचा-यांचा पगार देऊन यापुढे मी तुम्हाला पैसे देऊ शकणार नाही, असे म्हटले होते.
Advertisement
Advertisement

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी मुंबईतील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतच्या आत्महत्येमुळे बॉलिवूडवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. सुशांत निगडीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीची पोलिस चौकशी करत आहे. दरम्यान त्याच्या कर्मचा-यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात सुशांतच्या एका कर्मचा-याने सांगितले की, आत्महत्येच्या तीन दिवस आधी त्याने सगळ्यांचा पगार दिला होता. सोबतच यापुढे तो त्यांचे पैसे देऊ शकणार नाही, असेही म्हणाला होता.

दिशा सालियनसोबत झाले होते बोलणे 

वृत्तानुसार, सुशांतला त्याची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मदतीने 14 कोटींच्या एका वेब सीरिजचा कॉन्ट्रॅक्ट मिळणार होता. मात्र 8 जून रोजी 14 व्या मजल्यावरुन पडून दिशाचा मृत्यू झाला होता. मार्च महिन्यात दिशासोबत सुशांतचे दोनदा बोलणे झाले होते. दिशाच्या अकाली निधनामुळे सुशांत तणावात आला होता. एका पोलिस अधिका-याने सांगितल्यानुसार, आमच्या चौकशीत या दोघांचे एका प्रोजेक्टसंदर्भात व्हॉट्सअॅपवर दोनदा बोलणे झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर या दोघांमध्ये चर्चा झाली नव्हती.

मॅनेजरनेही हेच सांगितले

मिड डेच्या वृत्तानुसार, सुशांतने आपल्या कर्मचा-यांचा पगार देऊन यापुढे मी तुम्हाला पैसे देऊ शकणार नाही, असे म्हटले होते. त्यावर त्याचे कर्मचारी त्याला म्हणाले होते की, तुम्ही कायमच आमची काळजी घेतली आहे. असं म्हणू नका, आम्ही काहीतरी करू. सुशांतच्या मॅनेजरनेही वांद्रे पोलिसांना असेच काही सांगितले. मॅनेजरनेही सांगितले की, सुशांतने मृत्यूच्या तीन दिवसांपूर्वी त्याला पैसे दिले होते. सुशांतच्या हातात एकही प्रोजेक्ट नव्हता. त्यामुळे तो आर्थिक अडचणीत आला होता, असेदेखील सुशांतच्या एका निकटवर्तीयाने सांगितले आहे. 

Advertisement
0