आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोटो स्टोरी:तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता सुशांत सिंह राजपूत, जाणून घ्या इंजिनिअरिंग सोडून टीव्हीनंतर चित्रपटात कसा आला?

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतने ऐश्वर्या राय बच्चनसोबत ज्युनिअर डान्सर म्हणून डान्स केला होता.

सुशांत, म्हणजे शांत राहणारा माणूस आणि सुशांत सिंह राजपूत असाच होता, तो कमी बाेलायचा पण त्याचे काम त्याच्यापेक्षा जास्त बोलायचे. त्याच्या प्रत्येक चित्रपटात काही ना काही संदेश असायचा. तो हसतमुख जगणारा, सकारात्मक विचार करणारा अभिनेता होता. पण 14 जुलै रोजी त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलून या जगाचा कायमचा निरोप घेतला. त्याच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर सुशांतने असे का केले? हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. एक नजर टाकुया कायम हसतमुख राहणा-या सुशांतच्या आयुष्याशी निगडीत काही खास गोष्टींवर... 

  21 जानेवारी 1986 रोजी जन्मलेला सुशांतसिंह राजपूत चार बहिणींमध्ये एकुलता एक भाऊ होता. शिक्षणात खूप हुशार होता. 11 वीत फिजिक्स ऑलिम्पियाडमध्ये गेला होता. तेथे त्याला सुवर्णपदक मिळाले होते. त्याची एक बहीण मितु सिंह राज्यस्तरीय पातळीची क्रिकेटरदेखील होती. तो आपल्या आईच्या खूप जवळचा होता. मात्र 2002 मध्ये त्याच्या आईच्या निधनानंतर त्याचे पूर्ण कुटुंब पाटण्यावरून दिल्लीला शिफ्ट झाले होते. मात्र नंतर त्याचे कुटुंब पाटण्याला परतले. करिअर बनवल्यानंतर 17 वर्षांनी सुशांत पाटण्याला गेला होता. त्याच्या एका बहिणीचेही निधन झाले होते.  

दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शिकत असतानाच सुशांतने श्यामक डावरचा डान्स ग्रुप जॉइन केला होता. याबरोबरच तो अभिनयाचे धडेही घेत होता. सुशांतची एआयईईईमध्ये ऑल इंडियामध्ये 7 वी रँक आली होती. मात्र शिक्षण अर्धवटच सोडून तो ग्लॅमरच्या जगताकडे वळला. यात आपले करिअर करण्याचा विचार करू लागला. 

अभ्यासासोबतच सुशांतने श्यामक दावरचे डान्स क्लासेसमध्ये प्रवेश घेतला. श्यामकसोबत सुशांतने देश-विदेशात अनेक शोज केले. याबरोबरच अनेक चित्रपटात बॅकग्राउंड डान्सर्सचेही काम केले. त्यासोबतच नादिरा बब्बरसोबत थिएटरदेखील केले. इंजिनिअरिंगच्या तिस-या वर्षाला असताना त्याने अभ्यास अर्धवट सोडला आणि अभिनयात करिअर बनवण्यासाठी मुंबई गाठली.  

सुशांतने श्यामकच्या डान्स ग्रुपसोबत ऑस्ट्रेलियात झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये परफॉर्म केले होते. त्याने ऐश्वर्या राय बच्चनसोबत ज्युनिअर डान्सर म्हणून डान्स केला होता. 

डान्सनंतर सुशांत बॅरी जॉनचे अभिनय वर्कशॉपमध्ये सहभागी झाला होता. अनेक थिएटर केल्यानंतर त्याला किस देश में है मेरा दिल हा शो मिळाला. सुशांतची स्माइल बघून एकता कपूरने त्याला पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका दिली होती. या मालिकेतून तो घराघरांत पोहोचला होता.

सुशांत आपल्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिला. त्याचे पहिले रिलेशनशिप मालिका ‘पवित्र रिश्ता’ मध्ये त्याची सहकलाकार अंकिता लोखंडेसोबत राहिले. सहा वर्षांच्या नात्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. पण दोघांनीही त्यांच्या ब्रेकअपचे कारण समोर येऊ दिले नाही. यानंतर त्याचे नाव अभिनेत्री कृती सेननसोबतही जोडले गेले. तो तेव्हा तिच्यासोबत राब्ता चित्रपट करत होता. यानंतर तो आपली सहकलाकार संजना सांघीसोबत फिरताना दिसला होता. निधनाआधी सुशांत अभिनेत्री रिया चक्रवर्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. दोघे लिव्ह इनमध्ये राहत होते. 

सुशांतने अभिषेक कपूरच्या 'काय पो चे' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली होती. पहिल्याच चित्रपटातून त्याने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यानंतर तो शुद्ध देसी रोमान्स, पीके, ब्योमकेश बक्क्षी यांसाह अनेक चित्रपटांत झळकला होता. 

पापाराझी विरल भयानी यांनी क्लिक केलेला सुशांतचा फोटो त्याचा शेवटचा फोटो ठरला. 

मुलाच्या निधनाचे वृत्त समजताच त्याच्या वडिलांना जबर मानसिक धक्का बसला. वडिलांचे सांत्वन करताना सुशांतच्या बहिणी.  

बातम्या आणखी आहेत...