आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेदना मांडणाऱ्या पोस्ट:ट्विटरवर 'हे' छायाचित्र लावून काय सांगू इच्छित होता सुशांत सिंह राजपूत, ज्याची पेटिंग लावली त्यानेही केली होती आत्महत्या 

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेता सुशांत सिंहने 9 महिन्यांत शेअर केल्या वेदना मांडणाऱ्या दोन पोस्ट
  • नैराश्यातून संपवले जीवन, 9 जूनला माजी मॅनेजरने केली होती आत्महत्या
  • मोठ्या पडद्यावर शेवटच्या चित्रपटात डायलॉग होता- जिंदगी में अगर कुछ सबसे ज्यादा इंपॉर्टेन्ट है तो वो है खुद की जिंदगी...

34 वर्षीय अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केली. तो वर्षभरापासून नैराश्यात होता. मोठ्या पडद्यावर ‘छिछोरे’सारख्या चित्रपटात पित्याची भूमिका वठवणारा आणि चित्रपटात मुलांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी स्वत:च्या, मित्रांच्या अपयशाच्या कथा मुलांना ऐकवणारा अभिनेता सुशांतसिंह राजपूत रविवारी काळाच्या पडद्याआड गेला. रविवारी त्याने आत्महत्या केल्याची बातमी त्याच्या घरी कळाली आणि वडील के. के. सिंह बेशुद्ध होऊन कोसळले. त्यांचे कुटुंब बिहारमधील पुर्णिया येथील रहिवासी होते. 2000 मध्ये हे कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले. 2002 मध्ये त्याच्या आईचे निधन झाले होते. त्याला चार बहिणी आहेत. त्यातील एक मितू ही राज्यस्तरीय क्रिकेटपटू आहे. पाच महिन्यांनंतर नोव्हेंबरमध्ये सुशांतचाही विवाह ठरला होता.

वांद्र्यातील त्याच्या फ्लॅटमधून पोलिसांनी सुशांत याचा फास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह जप्त केला. त्याने आत्महत्या का केली हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. 9 जून रोजी सुशांत याची माजी मॅनेजर सलियन हिनेही इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली होती. तेव्हा सुशांतने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती की, ही अत्यंत दुखद बातमी आहे... 

  • यातूनही होता इशारा- 'मैं हूं भी और नहीं भी'

सुशांत सुमारे दीड वर्ष तणावात होता. त्यावर उपचारही चालू होते. याची प्रचिती त्याच्या सोशल मीडिया पोस्ट व ट्विटर होम पेजवरून येत होती. त्याने वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या मनातील ही वेदना शब्दांतून जाहीर केली होती.

सुशांतने ट्विटर अकाउंटच्या होम पेजवर नेदरलँडचे प्रसिद्ध चित्रकार विन्सेट वॅन गॉगचे प्रसिद्ध पेंटिंग “स्टार नाइट’ ठेवले होते. गॉग यांनी 1890 मध्ये वयाच्या 37 वर्षी गोळी झाडून आत्महत्या केली होती.

सुशांतने त्याच्या ट्विटरवर ठेवलेले पेंटिंग
सुशांतने त्याच्या ट्विटरवर ठेवलेले पेंटिंग

9 महिन्यांत दोन पोस्ट अशा वेदना मांडणाऱ्या...

‘आंसू की बूंदों से घुलता अतीत, हवा में ही घुलता जा रहा है... मुस्कुराहट की एक लकीर को उकेरते सपने और एक क्षणभंगुर जीवन, दोनों के बीच गुजर रहा है... मां’ - (3 जून2020)

त्याने ट्विटरवर जलालुद्दीन रूमी यांच्या ओळी लिहिल्या होत्या...

‘जैसे कोई परछाई.. मैं हूं भी.. और नहीं भी हूं...’ - (26 ऑक्टाेबर 2019)

बातम्या आणखी आहेत...