आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

द अनटोल्ड स्टोरी:‘डीडीएलजे’ पाहून आरशासमोर करायचा सराव, गरजूंसाठी उघडली संस्था; जाणून घ्या सुशांतविषयी अद्याप न उलगडेलेल पैलू 

मुंबई10 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • सुशांत आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चाहत्यांना उत्तर देण्यासाठी अर्ध्या तासाचा वेळ काढायचा.

सुशांत, म्हणजे शांत राहणारा माणूस आणि सुशांत सिंह राजपूत असाच होता, तो कमी बाेलायचा पण त्याचे काम त्याच्यापेक्षा जास्त बोलायचे. त्याच्या प्रत्येक चित्रपटात काही ना काही संदेश असायचा. तो हसतमुख जगणारा, सकारात्मक विचार करणारा अभिनेता होता. योग, ध्यान करायचा. अनेकदा आपल्या मनातील विचार शेअर करून मोठी गोष्ट सांगूून जायचा. त्याने आपल्या 50  स्वप्नांची यादीदेखील तयार केली होती. इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असलेल्या सुशांतला अॅस्ट्रोनॉमीची चांगली माहिती होती. तो याविषयी नेहमी वाचत असे. इतका सकारात्मक विचार करणारी आणि आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करणारी व्यक्ती आत्महत्या कशी करू शकते, यावर विश्वास बसत नाही. असो, आता सुशांत आपल्यामध्ये राहिला नाही. त्याच्या जीवनातील काही किस्से.. काही आठवणी जो आपल्याला तो देऊन गेला.

 • ‘डीडीएलजे’ पाहून करत होता आरशासमोर सराव

सुशांत जेव्हा चौथीमध्ये शिकत होता तेव्हा शाहरुख खानचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे’ चित्रपट पाहत होता. त्याला तो चित्रपट इतका आवडला की, तो त्या चित्रपटातील संवाद आरशासमोर उभा राहून म्हणायचा. घरात कुणाचे लग्न असले की तो खूप खुश असायचा कारण त्याला डान्स करण्याची संधी मिळायची. सुशांत शाहरुखचा मोठा चाहता होता त्यामुळेच त्याने बॅरी जॉनचा थिएटर ग्रुप जॉइन केला होता. शाहरुखदेखील या थिएटरशी कधीकाळी जॉइन होता. त्याने शाहरुख सारखेच मालिकेतून चित्रपटात पर्दापण केले होते.

 • गरजूंसाठी उघडली संस्था

सुशांतसिंह राजपूत भारत सरकारच्या महिला उद्योजक माध्यमाचा ब्रँड अॅम्बेसेडर होता, याविषयी खूपच कमी लोकांना माहीत असेल. शिवाय जी मुले आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतात, अशा तरुणांसाठी सुशांतने असे माध्यम सुरू केले होते. या माध्यमातून तो तरुणांना आर्थिक मदत करायचा.

 • पात्रासाठी घ्यायचा मेहनत

‘ब्योमकेश बक्शी’साठी त्याने 40 च्या दशकाचा हेर दिसण्यासाठी वजन कमी केले हाेते. यानंतर धोनीच्या बायाेपिकसाठी देखील त्याने शारीरिक मेहनत घेतली होती. याच्या सरावादरम्यान त्याच्या हाताला दुखापत झाली होती. केदारनाथ मधील पात्र मंसूर खानसाठी त्याने स्वत:ला एका रूममध्ये बंद केले होते. शिवाय पिठ्ठूच्या भूमिकेसाठीदेखील त्याने खूप मेहनत घेतली होती. ‘सोनचिड़िया’ मध्येदेखील त्याने चंबलची भाषा शिकण्यासाठी बरीच मेहनत घेतली होती.

 • खगोलशास्त्राची हाेती आवड

सुशांतला खगोलशास्त्राचीदेखील प्रचंड आवड होती. मुलांना अंतराळाची माहिती देण्याचे काम करण्याचे तो स्वप्न पाहत होता. त्याने आपल्या घरातील एका खोलीत अंतराळाची सर्व माहिती भिंतीवर लावून ठेवली होती. याबरोबरच तो अंतराळाची माहिती घेत होता.

 • पोस्ट डिलीट करुन नव्याने सुरुवात करायचा

सुशांत इतर कलाकारांप्रमाणे आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले चित्रपट आणि फोटो शेअर करत नव्हता तर चांगले विचार शेअर करायचा. तो नेहमी सर्व पोस्ट डिलीट करून पुन्हा नव्याने सुरुवात करायचा.

 • चाहत्यांना द्यायचा उत्तर

सुशांत आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चाहत्यांना उत्तर देण्यासाठी अर्ध्या तासाचा वेळ काढायचा. तो त्यांच्या कमेंट्सला प्रतिसादही द्यायचा आणि हजारो चाहत्यांना स्वत: फॉलो करत होता.

 • अपूर्ण राहिले प्रोजेक्ट

‘दिल बेचारा’, ‘चंदा मामा दूर के’, ‘रायफलमॅन’ आणि भारतीय हीरोवर आधारित एक चित्रपट

या संवादातून दिली शिकवण

 • ‘हम हार जीत, सक्सेस फेलियोर में इतना उलझ गए हैं कि जिंदगी जीना भूल गए हैं’- छिछोरे
 • ‘जिंदगी में अगर कुछ सबसे ज्यादा इंपॉर्टेन्ट है तो वो है खुद की जिंदगी’- छिछोरे
 • ‘दूसरों से हारकर लूजर कहलाने से कहीं ज्यादा बुरा है, खुद से हारकर लूजर कहलाना’- छिछोरे
बातम्या आणखी आहेत...