आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांतच्या मानसोपचारतज्ज्ञांचा जबाब व्हायरल:डॉ. सुझान वॉकर म्हणाल्या- 'आता आपण कधीही बरे होणार नाही यावर सुशांतचा विश्वास बसला होता, तो आजारपणाबद्दल निष्काळजीपणे वागत होता'

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुशांत सिंह राजपूतला त्याच्या आजारपणाची पूर्ण कल्पना होती, कारण तो कमी वयापासूनच एंग्झायटीवर उपचार घेत होता : डॉ. सुझान वॉकर
  • डॉ. सुझान वॉकर यांनी मुंबई पोलिसांना दिलेला जबाब व्हायरल होत आहे.
  • वॉकर यांच्या मते, सुशांत त्याच्या आईच्या खूप जवळ होता, तो कधी वडिलांच्या जवळ वाटला नाही.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मनोचिकित्सक राहिलेल्या डॉ. सुझान वॉकर यांनी सांगितल्यानुसार, सुशांत त्याच्या आईच्या खूप जवळ होता. आईच्या निधनानंतरही, त्याला वडील केके सिंह यांना जवळ करता आले नाही. सुझान यांनी मुंबई पोलिसांना दिलेला जबाब मीडियामध्ये व्हायरल होत आहे. यात त्यांनी असा दावाही केला की, आता आपण कधीही बरे होऊ शकणार नाही या गोष्टीवर सुशांतचा विश्वास बसला होता. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सुशांत बायपोलर डिसऑर्डरशी झगडत होता.

  • 2013-14 मध्ये मानसिक अवस्था खूप बिघडली होती

सुझान यांनी आपल्या जबाबात म्हटले की, "2013-14 या काळात सुशांतची एंग्झायटी लेवल लक्षणीय वाढली होती. अटेंशन डेफिसिट हायपर अ‍ॅक्टिव्हिटी डिसऑर्डर (एडीएचडी) च्या उपचारात एकाग्रता वाढविण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा तो अ‍ॅडेरॉल हे औषध घेत असे. तो खूप लाजाळू होता. यामुळे, त्याचे मित्र त्याला चिडवत असत. जेव्हा तो 15-16 वर्षाचा होता, तेव्हा त्याच्या आईचे पॅनिक अटॅकमुळे निधन झाले. त्याच्या म्हणण्यानुसार, तो त्याच्या आईच्या अगदी जवळ होता. आईच्या निधनानंतर तो आपल्या बहिणींच्या जवळ आला. पण मी त्याला कधी वडिलांच्या जवळ पाहिले नाही. सुशांत स्पेस, अ‍ॅस्ट्रॉनॉमी आणि फिजिक्सविषयी बोलायचा."

  • 'पहिल्या भेटीत तो घाबरला होता'

सुझानच्या म्हणण्यानुसार, जेव्हा सुशांतसोबत त्यांची पहिली भेट झाली होती तेव्हा तो खूप घाबरला होता. त्यांनी सांगितले, "जर त्याची एंग्झायटी 1 ते 10 च्या फुटपट्टीवर मोजली तर त्याची मानसिक स्थिती 9 पर्यंत पोहचली होती.''

  • 'रिया चांगली काळजी घेत होती'

रियाशी झालेल्या संभाषणाच्या आधारे सुझान म्हणाल्या की, रिया सुशांतची चांगली काळजी घेत असल्याचे त्यांना वाटले होते. पण सुशांत स्वत: त्याच्या आजाराबद्दल निष्काळजी होता. त्यांच्या मते, जूनमध्ये रियाचे त्यांच्याशी बोलणे झाले होते आणि त्यावेळी तिने सांगितले होते की, सुशांतने औषधे घेणे बंद केले आहे आणि त्याची मानसिक स्थिती खालावत चालली आहे.

  • 2013 चा उल्लेख रियानेदेखील केला होता

काही दिवसांपूर्वी रिया चक्रवर्तीने एका न्यूज चॅनेलला सांगितले होते की, 2013 मध्ये सुशांतची प्रकृती खालावली होती. तिच्या म्हणण्यानुसार, सुशांतने स्वत: ऑक्टोबर 2019 मध्ये युरोप टूरच्या प्रवासादरम्यान तिला हे सांगितले होते. रिया म्हणाली होती, "सुशांतने सांगितले की 2013 मध्ये त्याला नैराश्य आले होते आणि त्यावेळी तो हरीश शेट्टी नावाच्या मानसोपचार तज्ज्ञांना भेटला होता. स्वित्झर्लंडमध्ये पोहोचल्यावर सुशांतची अवस्था आणखी बिघडू लागली होती आणि आम्ही ट्रीप अर्ध्यावर सोडून मुंबईत परतलो होतो."

  • कुटुंब अद्याप हे स्वीकारण्यास तयार नाही

बुधवारी सुशांत सिंह राजपूतचे वडील के.के. सिंह यांचे वकील विकास सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुशांतच्या कुटुंबाला त्याच्या एंग्झायटी अटॅकविषयी कल्पना होती, पण तो नैराश्यात होता, यावर त्यांचा विश्वास नाही.

सुशांतचा मानसिक अवस्था बरी नव्हती, हे कबूल करण्यास हे कुटुंब अजूनही संकोच करत आहे. त्यांचे अजूनही हेच म्हणणे आहे की, रियाने त्याला ड्रग्ज देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. त्याला कुटुंबापासून वेगळे करुन त्याचे पैसे हडपण्याचा प्रयत्न केला, असा आरोप सुशांतचे कुटुंबीय रियावर करत आहेत. 14 जून रोजी सुशांतने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे.