आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पडद्यामागील गोष्टी उघड:समोर आल्या यशराज-सुशांत यांच्यातील कराराच्या अटी, ‘शुद्ध देसी रोमान्स’ या पहिल्या फिल्मसाठी सुशांतला मिळाले होते 30 लाख रुपये 

मुंबई (ज्योती शर्मा)3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यशराजबरोबर सुशांतने तीन चित्रपट साइन केले होते, त्यापैकी एक चित्रपट बनू शकला नाही.
  • यशराज फिल्म्सच्या वरिष्ठ अधिका-यांना चौकशीसाठी बोलवण्याची तयारी पोलिस करत आहेत.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 2012 मध्ये यशराज फिल्म्सबरोबर तीन चित्रपटांचा करार केला होता. त्यापैकी फक्त दोन चित्रपट (शुद्ध देसी रोमान्स आणि डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी) बनले. तिसरा चित्रपट (पानी) जाहीर झाल्यानंतर बंद पडला. पहिल्या चित्रपटासाठी सुशांतला 30 लाख रुपये देण्यात आले होते. यश राज यांच्या कराराच्या त्या प्रतीवरून ही माहिती समोर आली आहे, जी 19 जून रोजी प्रॉडक्शन हाऊसने पोलिसांच्या ताब्यात दिली होती.

अभिनेताच्या आत्महत्ये प्रकरणी मुंबई पोलिस सातत्याने चौकशी करत आहेत. ही चौकशी त्याच्या व्यावसायिक आयुष्यातील चढउतार लक्षात घेऊनही केली जात आहे. त्यामुळे यशराज यांना सुशांतबरोबर केलेल्या कराराची प्रत मागितली गेली. करारामधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एखादा चित्रपट हिट होता की फ्लॉप? ते प्रॉडक्शन हाऊसच ठरवेल.

  • कराराच्या तीन महत्वाच्या गोष्टी

करारानुसार सुशांतला यशराजबरोबर तीन चित्रपट करायचे होते आणि सर्वांचे नियम व अटी वेगवेगळ्या होत्या. विशेषत: फीसंदर्भात तीन मुद्दे खालीलप्रमाणे होते - 

  • पहिल्या चित्रपटासाठी 30 लाख रुपये मिळतील. जर चित्रपट हिट ठरला तर दुसर्‍या चित्रपटासाठी 60 लाख आणि फ्लॉप झाल्यास दुसर्‍या चित्रपटासाठी 30 लाख रुपये मिळतील.
  • जर पहिला आणि दुसरा चित्रपट हिट असेल तर तिसर्‍या चित्रपटासाठी 1 कोटी रुपये दिले जातील. पण जर पहिला हिट आणि दुसरा फ्लॉप झाला तर तिसर्‍यासाठी 30 लाख रुपये मिळतील.
  • पहिला चित्रपट फ्लॉप झाला आणि दुसरा हिट ठरला तर तिसर्‍यासाठी 60 लाख रुपये दिले जातील.

मोठा प्रश्नः दुसर्‍या चित्रपटासाठी सुशांतला 1 कोटी का दिले?

सूत्रांच्या माहितीनुसार, सुशांतचा पहिला चित्रपट म्हणजेच 'शुद्ध देसी रोमांस' हिट ठरल्याने यशराजने त्याला 'डिटेक्टिव ब्योमकेश बक्षी' या दुस-या चित्रपटासाठी एक कोटी रुपये दिले होते. मात्र करारानुसार ही रक्कम 60 लाख रुपये असायला हवी होती. प्रॉडक्शन हाऊसने हे का केले? याचे उत्तर अद्याप सापडले नाही. आत्तापर्यंत, या प्रश्नाला उत्तर म्हणून आतापर्यंत ज्यांचे जबाब नोंदवले गेले, त्यांना याबद्दल काहीच माहिती नसल्याचे पोलिसांना सांगितले.

  • शेखर कपूर यांचा 'पानी' क्रिएटिव्ह डिफरन्सचा बळी ठरला

सुशांतचा तिसरा चित्रपट ‘पानी’ शेखर कपूर दिग्दर्शित करणार होते. पण प्रॉडक्शन हाऊस आणि शेखर कपूर यांच्यातील क्रिएटिव्ह डिफरन्समुळे हा चित्रपट फ्लोअरवर येऊ शकला नाही. अलीकडेच व्यापार पंडितांनी दैनिक भास्करशी बोलताना सांगितले होते की, शेखर कपूर यांनी या चित्रपटासाठी यशराजला दीडशे कोटी रुपयांचे बजेट दिले  होते, ज्याला आदित्य चोप्रा यांनी नकार दिला होता. वाढत्या बजेटमुळे आदित्य चोप्रा यांनी हा प्रोजेक्ट बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

  • यशराज यांच्या काही मोठ्या अधिका-यांची चौकशी केली जाईल

शुक्रवारी प्रॉडक्शन हाऊसचे दोन माजी वरिष्ठ अधिकारी आशिष सिंग आणि आशिष पाटील यांची वांद्रे पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. यानंतर शनिवारी सुशांतला कास्ट करणारे यशराजचे कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांनाही पोलिस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलविण्यात आले. परंतु पोलिस अजूनही करारातील अटी जाणून घेत आहेत. त्यामुळे प्रॉडक्शन हाऊसच्या आणखी काही मोठ्या अधिका-यांना चौकशीसाठी बोलवण्याची तयारी सुरू आहे.