आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत प्रकरणात ईडीची चौकशी:सुशांतच्या बँक खात्यातून भरला जात होता त्याच्या एका एक्स-गर्लफ्रेंडच्या फ्लॅटचा हप्ता, ती मैत्रीण अजूनही त्याच फ्लॅटमध्ये राहते

मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • ईडीच्या सूत्रांच्या हवाल्यातून हा दावा केला गेला आहे. त्या गर्लफ्रेंडच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नाही
 • सुशांतच्या खात्यात कोट्यावधी रुपये असल्याचा खुलासा, दोनच दिवसांत दोन एफडीही तोडल्या गेल्या होत्या.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) मनी लाँडरिंगच्या अँगलने तपास करीत आहेत. दरम्यान, एक मोठा खुलासा झाल्याचा दावा केला जात आहे. एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, त्याच्या एका एक्स-गर्लफ्रेंडच्या फ्लॅटचा हप्ता सुशांतच्या खात्यातून भरला जात होता. खास गोष्ट म्हणजे त्याची ती मैत्रीण अजूनही त्या फ्लॅटमध्ये राहत आहे. तथापि, सुशांतच्या ही एक्स गर्लफ्रेंड कोण कोण आहे? याचा खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही.

तपासात आतापर्यंत हे उघड झाले आहे

 • दोन सीएच्या खात्यात 2.63 कोटी रूपये ट्रान्सफर झाले

रिपोर्टनुसार सुशांतच्या खात्यातून मे 2019 ते एप्रिल 2020 या कालावधीत दोन चार्टर्ड अकाउंटंटच्या खात्यात 2.63 कोटी रुपयांचा व्यवहार झाला होता. त्यातील एकाचे नाव संदीप श्रीधर असे आहे, जो सुशांतच्या मृत्यूच्या आधी त्याच्यासाठी वर्षभर काम करत होता.

 • दोन दिवसांत दोन एफडीतून अडीच कोटी काढले

सुशांतने आपली बहीण राणीसाठी दोन फिक्स डिपॉझिट केल्याची माहिती आहे. दोघांची एकूण रक्कम 4.5 (2.5 + 2) कोटी होती. परंतु दोन दिवसांनंतरच दोन्ही एफडीमधून 2.5 (1.5 + 1) कोटी काढण्यात आले होते. या दोन्ही फिक्स डिपॉझिट 26 नोव्हेंबर 2019 रोजी करण्यात आल्या आणि 28 नोव्हेंबर रोजी त्या तोडून नवीन फिक्स डिपॉझिट प्रत्येकी एक कोटीची करण्यात आली. रिया चक्रवर्तीच्या सांगण्यावरुनच दोन सीएच्या खात्यात 2.63 कोटी रुपयांचे ट्रान्सफर आणि मुदत ठेवींमधून अडीच कोटी कपात केल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबीयांनी केला आहे.

 • खात्यात 10 कोटींपेक्षा जास्त रकमेचा हिशोब मिळाला

सुशांतच्या खात्यातून 15 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप त्याचे वडील केके सिंह यांनी केला आहे. मात्र सुशांतच्या खात्यात 15 कोटी रुपये मिळाले नसल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. तपासात दहा कोटींपेक्षा जास्त रक्कम असल्याचे उघडकीस आले आहे. सुशांतच्या खात्यातून हस्तांतरित केलेली रक्कम बनावट शेल कंपनीच्या माध्यमातून झाल्याचा ईडीचा संशय आहे. या शेल कंपन्या रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यांच्या असल्याचे सूत्रांकडून समजते.

 • रियाने दोन वर्षात 3 कोटींची प्रॉपर्टी घेतली

ईडी रियाच्या तीन मालमत्तांचा शोध घेत आहे. यापैकी एक खार भागात, दुसरी जुहू आणि तिसरी नवी मुंबईत आहे. या तिन्ही मालमत्तांचे बाजार मूल्य सुमारे 3 कोटी असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रियाने 2018 नंतर या तीन प्रॉपर्टी खरेदी केल्या. दोनच वर्षांत रियाने कोट्यवधींची मालमत्ता कशी विकत घेतली हे शोधण्याचा प्रयत्न ईडी करीत आहे. रिया केवळ तिच्या खार येथील फ्लॅटविषयी सविस्तर माहिती देऊ शकली आहे.

 • रियाने दोन वर्षांत एक कोटीची मालमत्ता विकली

रिया चक्रवर्तीच्या आयटीआरमधून धक्कादायक खुलासा झाला आहे. तो म्हणजे रियाने 2017-18 मध्ये मालमत्ता विकून 45 लाखांची कमाई केली. तर 2018-19 मध्ये तिने 58 लाख रुपयांची मालमत्ता विकली होती. रियाने दोन वर्षांत एकुण एक कोटी तीन लाख रुपयांची मालमत्ता विकली होती. परंतु, दोन वर्षांत तिने केवळ 37.2 लाख रुपये कमावले असताना एवढी मालमत्ता कशी जमवली याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. ईडीने रियाकडे प्रॉपर्टीची कागदपत्रे मागितली आहेत.

 • सुशांतच्या कंपनीचा आयपी अ‍ॅड्रेस अनेकदा बदलण्यात आला

एका रिपोर्टनुसार, सुशांतच्या कंपनीचा आयपी अ‍ॅड्रेस एका वर्षात तब्बल 18 वेळा बदलला गेला होता. खास गोष्ट म्हणजे सुशांतच्या मृत्यूनंतरदेखील तो 3 वेळा बदलण्यात आला. अद्याप यामागचे कारण समोर आलेले नाही. इंडिया टीव्हीच्या वृत्तानुसार, सुशांतच्या कंपनीचा आयपी अ‍ॅड्रेस शेवटचा 7 ऑगस्ट रोजी बदलण्यात आला होता. याच दिवशी रियाची पहिल्यांदा ईडीने चौकशी केली होती. ईडी या मागचे कारण शोधण्याचाही प्रयत्न करत आहे.

 • कंपनी सुशांतची, मात्र स्वाक्षरी शोविकची चालायची

सूत्रांच्या माहिचीनुसार, सुशांतने त्याच्या चार कंपन्यांपैकी 2 कंपन्यांना पेटंट केले होते. त्यापैकी विविड्रेज रिअ‍ॅलिटी एक्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​संचालक रिया आणि शोविक होते. सुशांतने सप्टेंबर 2019 मध्ये स्टार्टअप म्हणून या कंपनीची नोंदणी केली होती. ही एक आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर आधारित गेमिंग कंपनी होती ज्याच्या पेटंटचे कायदेशीर अधिकार रिया, शोविक आणि सुशांत यांच्याकडे होते. हे पेटंट विकून कोट्यवधींची कमाई करता येऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, संपूर्ण प्रकरण संशयास्पद आहे.कारण सुशांतच्या आत्महत्येनंतर या कंपनीचे सर्व कायदेशीर हक्क रिया आणि शोविक यांच्याकडे आहेत. वास्तविक, ही कंपनी सुशांतने सुरू केली होती, परंतु यावर मालकी हक्क आणि स्वाक्षरी शोविकची होती.

 • रिया सुशांतचे सर्व निर्णय घेत असे

सुशांतची माजी व्यवस्थापक श्रुती मोदीने ईडी अधिका-यांना सांगितले की, सुशांतचे सर्व निर्णय मग ते वैयक्तिक असो किंवा व्यावसायिक, ते रियाच घेत होती.

बातम्या आणखी आहेत...