आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्कादायक:सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा धक्का सहन करु शकले नाहीत चाहते, 21 वर्षीय शिक्षिकेसह एका विद्यार्थ्यानेही संपवले आपले आयुष्य

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांत सिंह राजपूतची फॅन फॉलोईंग बरीच मोठी आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे त्याच्या चाहत्यांना प्रचंड मोठा धक्का बसला आहे. वृत्तानुसार,  विशाखापट्टणममधील त्याची एक चाहती हा धक्का सहन करु शकली नाही आणि तिने गळफास घेतला. गेल्या बुधवारी ही घटना घडल्याची माहिती आहे.

 21 वर्षीय शिक्षिका होती सुशांतची मोठी चाहती
 
मुंबई मिररच्या वृत्तानुसार, 21 वर्षीय ही चाहती एका खासगी शाळेत शिक्षिका होती. अभिनेत्याच्या मृत्यूच्या दु:खापासून ती स्वतःला सावरू शकली नाही. सुशांतच्या मृत्यूची बातमी आल्यापासून ती त्याचे व्हिडीओ बघत होती आणि डिप्रेशनमध्ये गेली होती.

  घरातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रूमच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत ती आढळली. हार्बर विभागाचे सहायक पोलिस आयुक्त टी. मोहन राव यांनीही एका रिपोर्टमध्ये याला दुजोरा दिला आहे.

बिहारमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या 

  सुशांतच्या आत्महत्येची बातमी ऐकल्यानंतर त्याच्या आणखी एका चाहत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा चाहता बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील चंडी ठाणे क्षेत्रातील लोदीपुर गावातील रहिवाशी होता. मिडिया रिपोर्टनुसार, मृत चाहता 'सुशांतचा मृत्यू होऊ शकत नाही,' असे म्हणत होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, या विद्यार्थ्याने आत्महत्या करण्यापूर्वी सुशांत सिंह राजपूतचा एमएस धोनी 'द अनटोल्ड स्टोरी'  हा चित्रपट पाहिला होता. गेल्या मंगळवारी सकाळी तो आपल्या घरातील एका खोलीमध्ये गेला आणि तेथेगळफास घेतला. बराच वेळानंतर त्यात्या घरच्यांनी खोलीचा दरवाजा वाजवला. परंतु, खोलीमधून कोणताही आवाज येत नसल्याने त्याच्या घरच्यांनी दरवाजा तोडला असता तो मृतावस्थेत आढळला. 

सुशांतने 14 जून रोजी केली आत्महत्या  

14 जून रोजी 34 वर्षीय सुशांतने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तो मागील सहा महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये होता. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून त्याच्या आत्महत्येचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. काहींच्या मते, त्याने चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलले.  

बातम्या आणखी आहेत...