आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रद्धाला भासतेय सुशांतची उणीव:IIFI-2021 साठी झाली 'छिछोरे'ची निवड, सुशांतच्या अनुपस्थितीमुळे श्रद्धा झाली भावूक

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता 'छिछोरे'

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट म्हणजे 'छिछोरे'. या चित्रपटाची नुकतीच 51 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) साठी निवड झाली आहे. चित्रपटाच्या या अचिव्हमेंटवर सुशांतची सह-अभिनेत्री श्रद्धा कपूर भावूक झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट श्रद्धाच्या मनाच्या अगदी जवळ आहे.

श्रद्धाला सुशांतची उणीव भासतेय

बॉलिवूड हंगामाने आपल्या रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, "श्रद्धा आनंदी आहे कारण ती तिच्या सह-अभिनेत्याची सुंदर आठवण आहे आणि तिला पुन्हा ती पाहण्याची संधी मिळणार आहे. दुसरीकडे, चित्रपटातील कलाकारांसह हा आनंदाचा क्षण अनुभवण्यासाठी सुशांत नसल्याने श्रद्धा भावूक देखील झाली आहे." 51 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 16 ते 24 जानेवारी दरम्यान गोव्यात रंगणार आहे.

2019 मध्ये प्रदर्शित झाला होता 'छिछोरे'

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘छिछोरे’ हा चित्रपट 6 सप्टेंबर 2019 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सुशांत आणि श्रद्धाने पती-पत्नीची भूमिका साकारली होती. चित्रपटाची कहाणी या दोघांच्या मुलाच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर सुरू होते, जी फ्लॅशबॅकमध्ये त्यांच्या कॉलेज जीवनाबद्दल सांगते. या चित्रपटात वरुण शर्मा, ताहिर राज भसीन, नवीन पोलिशेट्टी, तुषार पांडे आणि प्रतिक बब्बर यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.

बातम्या आणखी आहेत...