आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आठवणी:अंकिता लोखंडेसाठी सेटवर भांडला होता सुशांत सिंह राजपूत, को-स्टार्स उषा नाडकर्णी यांनी सांगितला 'तो' किस्सा

उमेश कुमार उपाध्याय. मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांत खूप समजूतदार होता, तो कधीही उलटून बोलायचा नाही, असे उषा नाडकर्णींनी सांगितले.

टेलिव्हिजनवरुन आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणा-या सुशांत सिंह राजपूतने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. आपल्या छोट्या पण सुंदर प्रवासात सुशांतने बर्‍याच स्टार्ससोबत स्क्रीन शेअर केली. त्याच्या आत्महत्येमुळे संपूर्ण इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. पवित्र रिश्ता या मालिकेत सुशांतच्या आईची भूमिका वठवलेल्या उषा नाडकर्णी यांनी त्याच्याविषयीची काही किस्से शेअर केले आहेत.

प्रत्येक आईला सुशांतसारखा मुलगा हवा

सुशांत सिंह राजपूत एवढे टोकाचे पाऊल उचलू शकेल, असे कधी वाटलेच नाही. तो खूपच मृदुभाषी मुलगा होता. अगदी लाजाळू. लाजाळू म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये तो सर्वात लहान  होता ना! जेव्हा आला होता, तेव्हा मला वाटते की तो बहुधा 22-23 वर्षांचा असावा. आता तर ‘पवित्र रिश्ता’ येऊन 11 वर्षे झाली आहेत, त्यामुळे तो बहुधा 32-33 वर्षांचा असेल. त्यावेळी ही मालिका पाहून, आपल्याला मानवसारखा मुलगा असावा, असे प्रत्येक आईला वाटत असे. दारूडे वडील, मारहाण करणारा लहान भाऊ, आईची प्रत्येक गोष्ट ऐकणारा मुलगा गॅरेजमध्ये मेहनत आणि प्रामाणिकपणे काम करत होता. सेटवर येताच भेट होत असे. तो सर्वांना ‘हाय, हॅलो’ म्हणत असे. 

अंकिताच्या प्रेमात आकंठ बुडाला होता सुशांत 

आमच्या घरात आई-वडील-भाऊ सर्वच जण असतात, तेव्हा भांडणेही होतातच, भांडणाशिवाय घर कसे असेल? एक दिवस सुशांत माइकवरुन सेटवर सुहासवर चिडला होता. तसं पाहता ती अंकिताची चुक होती. कारण ती काम संपल्यानंतरही माइक न काढताच तसाच लावून फिरायची. सुशांत माइकरुन सुहासवर चिडला होता. तेव्हा मी त्याला मेकअप रूममध्ये घेऊन गेले. त्याला समजावून सांगितले तेव्हा तो शांत झाला. मी त्याला म्हटले होते की, तू उगाचच सुहावर चिडला, तू अंकिताला समजवायला पाहिजे होते. सुशांतने माझे म्हणणे शांतपणे ऐकले. तो अंकिताच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. सुशांत खूप समजूतदार होता, तो कधीही उलटून बोलायचा नाही.  

बातम्या आणखी आहेत...