आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत प्रकरणात नवा खुलासा:सुशांतच्या कंपनीचा आयपी अ‍ॅड्रेस एका वर्षात 18 वेळा आणि त्याच्या मृत्यूनंतर तीनदा बदलण्यात आला, रिया ईडीच्या ऑफिसमध्ये पोहोचली तेव्हा शेवटच्या वेळी बदलण्यात आला

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या एका कंपनीचे लीगल राइट्स रिया आणि तिचा भाऊ शोविकजवळ आहेत.
  • शोविकची ईडीने आतापर्यंत 23 तास चौकशी केली आहे. सोमवारीही तो ईडीच्या कार्यालयात पोहोचला.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय आर्थिक बाबीच्या अँगलने चौकशी करीत आहे. यासाठी रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक, वडील इंद्रजित चक्रवर्ती ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. दरम्यान, सुशांतच्या कंपनीशी संबंधित महत्वाची माहिती पुढे येत आहे. एका रिपोर्टनुसार, सुशांतच्या कंपनीचा आयपी अ‍ॅड्रेस एका वर्षात तब्बल 18 वेळा बदलला गेला होता. खास गोष्ट म्हणजे सुशांतच्या मृत्यूनंतरदेखील तो 3 वेळा बदलण्यात आला. अद्याप यामागचे कारण समोर आलेले नाही.

  • 7 ऑगस्ट रोजी शेवटचा बदलला गेला आयपी अ‍ॅड्रेस

इंडिया टीव्हीच्या वृत्तानुसार, सुशांतच्या कंपनीचा आयपी अ‍ॅड्रेस शेवटचा 7 ऑगस्ट रोजी बदलण्यात आला होता. याच दिवशी रियाची पहिल्यांदा ईडीने चौकशी केली होती. ईडी या मागचे कारण शोधण्याचाही प्रयत्न करत आहे.

  • कंपनी सुशांतची, मात्र स्वाक्षरी शोविकची चालायची

सूत्रांच्या माहिचीनुसार, सुशांतने त्याच्या चार कंपन्यांपैकी 2 कंपन्यांना पेटंट केले होते. त्यापैकी विविड्रेज रिअ‍ॅलिटी एक्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​संचालक रिया आणि शोविक होते. सुशांतने सप्टेंबर 2019 मध्ये स्टार्टअप म्हणून या कंपनीची नोंदणी केली होती. ही एक आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर आधारित गेमिंग कंपनी होती ज्याच्या पेटंटचे कायदेशीर अधिकार रिया, शोविक आणि सुशांत यांच्याकडे होते.

हे पेटंट विकून कोट्यवधींची कमाई करता येऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, संपूर्ण प्रकरण संशयास्पद आहे.कारण सुशांतच्या आत्महत्येनंतर या कंपनीचे सर्व कायदेशीर हक्क रिया आणि शोविक यांच्याकडे आहेत. वास्तविक, ही कंपनी सुशांतने सुरू केली होती, परंतु यावर मालकी हक्क आणि स्वाक्षरी शोविकची होती.

  • रियाने दोन वर्षात 3 कोटींची मालमत्ता जमवली

रिया चक्रवर्तीने अवघ्या दोन वर्षांत 3 कोटींची संपत्ती बनविली. त्यातील एक खार मधील वन बीएचके फ्लॅट आहे, ज्याची किंमत एक कोटी रुपये आहे. दुसरी मालमत्ता जुहूमध्ये आहे, जिथे रिया कुटुंबासमवेत राहते. त्याचे बाजार मूल्य सुमारे दीड कोटी रुपये आहे. तिसरी मालमत्ता नवी मुंबईतील उल्वा येथे असून त्याची किंमत 50 लाख रुपये आहे.

  • आतापर्यंतची सर्वात दीर्घ चौकशी रियाच्या भावाची झाली

मनी लाँडरिंग प्रकरणातील प्रदीर्घ चौकशी रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीची झाली आहे. 7 ऑगस्ट रोजी त्याची सुमारे दोन तास चौकशी करण्यात आली, तर 8 ऑगस्ट रोजी पुन्हा त्याला ईडीने बोलावले आणि सुमारे 18 तासांच्या चौकशीनंतर 9 ऑगस्ट रोजी सकाळी 6:25 वाजता त्याला घरी जाण्यास परवानगी देण्यात आली. म्हणजेच आतापर्यंत त्यांची 23 तासांपेक्षा अधिक काळ चौकशी केली गेली आहे. 10 ऑगस्ट रोजी तो पुन्हा चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात पोहोचला.

रिया आणि तिच्या कुटुंबीयांव्यतिरिक्त तिचा सीए रितेश शहा आणि सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर श्रुती मोदी यांची 7 ऑगस्ट रोजी चौकशी झाली. त्यांनाही पुन्हा 10 ऑगस्टला ईडी कार्यालयात बोलविण्यात आले. सुशांतचा फ्लॅटमेट आणि मित्र सिद्धार्थ पिठानीला 8 ऑगस्ट रोजी ईडी कार्यालयात बोलविण्यात आले होते. पण तो आला नाही. त्याला पुन्हा 10 ऑगस्टसाठी समन्स बजावण्यात आले आहे. वृत्तानुसार, सुशांतचा आणखी एक मित्र संदीप सिंग यालाही चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. दोघांमधील व्यवहाराची बाबही ईडीकडे आली आहे.

बातम्या आणखी आहेत...