आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर कंगना रनोट हिने बॉलिवूडमधील घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित केला होता. यामुळे देशभरात नेपोटिझमवर बरीच चर्चा झाली. बॉलिवूडमध्ये स्टार किड्सला मिळत असलेल्या कामामुळे वादंग उठले, सुशांतच्या चाहत्यांनी तर बर्याच स्टार्सवर बहिष्कार टाकला होता. आलिया भट्टच्या 'सडक 2' ला याचा मोठा फटका बसला होता.
त्यावेळी बॉलिवूड दोन भागात विभागले गेले होते, परंतु जस जसा काळ जातोय, तसतसा घराणेशाहीच्या मुद्याचा लोकांना विसर पडत चालला आहे. यावर्षीही बॉलिवूडमध्ये चार स्टार किड्सना लाँच करण्यात येणार आहे. त्याचबरोबर असेही म्हटले जात आहे की, बॉलिवूडमध्ये नेपोटिझम पुर्वीच्या तुलनेत कमी झाले आहे.
यावर्षी बॉलिवूडमध्ये या स्टार किड्सची होतेय एंट्री
1. आणखी एक देओल
सनी देओल यांनी त्यांचा दुसरा मुलगा राजवीर देओलला बॉलिवूडमध्ये लाँच करणार असल्याची घोषणा केली आहे. राजवीरचे आजोबा धर्मेंद्र यांच्यासह अनेक बड्या कलाकारांनी राजवीरचे स्वागत केले आहे. यापूर्वी सनी यांनी 2019 मध्ये 'पल-पल दिल के पास' चित्रपटाद्वारे थोरला मुलगा करण देओलला लाँच केले होते.
2. सुनील शेट्टीचा मुलगा अहान
सुनील शेट्टीचा मुलगा अहानच्या आगामी ‘तडप’ या चित्रपटाचे प्रमोशनल अनेक बड्या स्टार्सनी त्यांच्या सोशल मीडियावर केले आहे. 'तडप'चे शूटिंग संपले असून चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख निश्चित झाल्याने सर्वांनी शेट्टी कुटुंबाचे अभिनंदन केले होते.
3. सूरज बडजात्यांचा दिग्दर्शक मुलगा
राजश्री प्रॉडक्शनच्या सूरज बडजात्या यांनी 2015 मध्ये आलेल्या 'प्रेम रतन धन पायो'नंतर कोणताही चित्रपट बनवला नाही. काही काळापासून ते त्यांचा मुलगा अवनीशला दिग्दर्शक म्हणून लाँच करण्याची तयारी करत होता. अवनीश सनी देओल यांचा मुलगा राजवीरच्या डेब्यू चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. अशा प्रकारे अवनीश बडजात्या यांच्या चित्रपटाच्या निर्मितीचा वारसा पुढे नेणार आहे.
4. शनायाला लाँच करणार करण जोहर
बॉलिवूडमध्ये घराणेशाहीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करण जोहरवर आहे, परंतु करणने अशा प्रकारच्या आरोपांकडे कधीही लक्ष दिले नाही. त्याने संजय कपूरची मुलगी शनाया कपूरला लाँच करणार असल्याची घोषणा तीन महिन्यांपूर्वीच केली. शनायाचा चुलत भाऊ अर्जुन, जान्हवी आणि सोनम यांनी यापूर्वीच बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी जागा निर्माण केली आहे.
सारा अली खान, अनन्या पांडे, टायगर श्रॉफसारखे स्टार किड्स चित्रपटांमध्ये काम करत आहेत. त्यांच्या प्रोजेक्ट्सची एकामागून एक घोषणा होत आहे. टायगर गणपत, हीरोपंती -2 आणि बागी -4 सारख्या चित्रपटात दिसणार आहे.
जान्हवीची बहीण खुशी कपूर, शाहरुखची मुलगी सुहाना आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेलीदेखील पुढच्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.
कंगनाने घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित केला आणि बॉलिवूडमध्ये वादंग उठले
सुशांतच्या निधनानंतर अभिनेत्री कंगना रनोट हिने बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या मुद्दयाला तोंड फोडले. करण जोहर आणि इतर निर्मात्यांवर सुशांतसारख्या आउट साइडवर अन्याय केल्याचा आरोप कंगनाने केला होता.
या वादानंतर बॉलिवूडचे दोन भागात विभाजन झाले. आर. बाल्की यांच्यासारख्या फिल्म मेकर्सनी नेपोझमचा बचाव केला होता, तर शेखर कपूर यांनी घराणेशाहीला होत असलेला विरोध योग्य असल्याचे म्हटले होते.
'सडक -2' ला बसला सर्वात मोठा फटका
सुशांत सिंहच्या निधनानंतर 'सडक 2' चित्रपटाच्या ट्रेलरला यूट्यूबवर सर्वाधिक 45 लाख डिसलाइक मिळाले होते. आयएमडीबीवर चित्रपटाला सर्वात कमी 1.1 रेटिंग मिळाली. दुसरीकडे सुशांतच्या 'दिल बेचारा' या शेवटच्या चित्रपटाला सर्वाधिक रेटिंग मिळाली होती.
यापूर्वी नेपोटिझम होते, परंतु इतका वादविवाद झाला नव्हता
नेपोटिझमचा मुद्दा बर्याच वर्षांपासून आहे. परंतु, या गोष्टीकडे सर्वसामान्यांचे कधी एवढे लक्ष गेले नव्हते. मात्र सुशांतच्या निधनानंतर संपूर्ण देश या विषयावर भावूक झाला. कंगनाने बॉलिवूडच्या अनेक निर्मात्यांना खलनायक म्हणून संबोधले आणि लोकांनी तिला उघडपणे समर्थन दिले.
कार्तिकचे प्रकरण आणि सोशल मीडिया इफेक्ट
पूर्वी नेपोटिझमसारखे मुद्दे चर्चेत असत, पण संपूर्ण देशात एकाच वेळी त्यावर चर्चा होत नसे. परंतु आता सोशल मीडियामुळे प्रत्येक जण आपले मत व्यक्त करू शकतो किंवा इतरांना जोडू शकतो. याचा पुरावा म्हणजे कार्तिक आर्यनचे अलीकडील प्रकरण. सत्य काहीही असो, परंतु लोकांनी आधीच कार्तिकला घराणेशाहीचा बळी म्हटले आहे.
नेपोटिज्म अजूनही आहे, परंतु आता कमी होत आहे
कास्टिंग डायरेक्टर वैभव विशांत यांनी भास्करसोबतच्या बातचीतमध्ये सांगितले की, इंडस्ट्रीमध्ये अजूनही नेपोटिज्म आहे, परंतु आता त्याविरूद्ध जागरूकता वाढली आहे. ओटीटी आता गेम बदलत आहे आता इंडस्ट्री योग्य दिशेने वाटचाल करत आहे.
कोणताही निर्माता पीरियड फिल्म, एखाद्या खास विषयावर आधारित चित्रपट किंवा मोठ्या बजेट चित्रपटांमध्ये जोखीम घेऊ इच्छित नाही. '83' या चित्रपटाच्या कास्टिंगचा संदर्भ देताना ते म्हणाले की, आम्हाला त्या काळातील संपूर्ण भारतीय टीम रेप्लिकेट कायची होती. म्हणजे येथे रिलेशन किंवा नेटवर्कवरून कास्टिंग करण्याचा प्रश्नच येत नव्हता.
स्टार कुटुंबातील लोकांना काम मिळणे कधी थांबवणार नाही
वैभव म्हणतात की, आता स्टार कुटुंबांशी संबंधित लोकसुद्धा आपल्या मुलांसाठी किंवा स्वत:साठी योग्य भूमिका शोधण्यात आमची मदत घेतात. आमच्या कास्टिंग एन्टी एजन्सीमध्ये स्टार किडला कोणतीही सवलत मिळत नाही. इतरांप्रमाणेच त्यांनादेखील स्क्रिप्ट तयार झाल्यानंतर ऑडिशन आणि लूक टेस्टसारख्या सर्व प्रक्रियेतून जावे लागले.
हे देखील खरे आहे की, कास्टिंगच्या वेळी एखादा कलाकार एखाद्या स्टार कुटुंबातील आहे की नाही यावर आम्ही लक्ष देत नाही. स्टार कुटूंबातील असणे हा गुन्हा नाही. प्रतिभा आणि कठोर परिश्रमातून जे योग्य आहे ते त्यांना मिळाले पाहिजे.
'बेल बॉटम', 'ब्रह्मास्त्र' आणि 'मैदान' यासारखे आगामी चित्रपट आणि 'फॅमिली मॅन'सारख्या वेब सीरिजचे कास्टिंग डायरेक्टर असलेले वैभव सांगतात, गेल्या एका वर्षात इंडस्ट्रीमध्ये बरेच बदल झाले आहेत. बरेच निर्माते प्रोफेशनल मदत घेत आहेत. आता देशभरातून उत्तम प्रतिभेची निवड केली जात आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.