आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत मृत्यू प्रकरण:माजी कुकचा खुलासा, रिया चक्रवर्ती सुशांत सरांची चांगली देखाभाल करत नव्हती, त्यांना त्यांच्या बहिणींनाही भेटू देत नव्हती

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अशोकने सांगितले की, रियाच्या सांगण्यावरून त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप होत आहेत. अलीकडेच सुशांतच्या घरी स्वयंपाकाचे काम करणा-या अशोकनेही रियावर टीका केली आहे.

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, 2016 ते सप्टेंबर 2019 या काळात सुशांतच्या घरी स्वयपाकी म्हणून काम करणा-या अशोकने सांगितले की, रियाने सुशांतची नीट काळजी कधीच घेतली नाही. ती सुशांतला त्याच्या बहिणींनादेखील भेटू देत नव्हती. जेव्हा बहिणी सुशांतला त्याच्या घरी भेटायला यायच्या, तेव्हा रिया सुशांतचा फोन उचलून तो व्यस्त असल्याने त्यांना भेटू शकणार नाही असे सांगत असे.

  • रियामुळे नोकरी गमावली

अशोक पुढे म्हणाला की, रियाच्या सांगण्यावरून त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. गेल्या वर्षी सुशांत आणि रिया युरोप टूरवरुन परत आले तेव्हा अशोकला हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडाने तुझी नोकरी गेली आहे, असे सांगितले होते.

सुशांतच्या मानसिक स्थितीबद्दल विचारले असता अशोक म्हणाला की, सुशांत आजारी राहू लागला होता. एकतर तो झोपून असायचा किंवा तो बेडवर पडला असायचा. त्याचे आयुष्य औषधांवर झाले होते. अशोक सांगितल्यानुसार, जर तो सुशांतच्या घरात काम करत राहिला असता तर त्याने नक्कीच त्याला सक्रिय ठेवण्याचे प्रयत्न केले अशते.

  • रियाने बर्‍याच लोकांना काढून टाकले होते, सरांनी असे कधी केले नाही

यापूर्वी सुशांतच्या आयुष्यावर रियाचे नियंत्रण असण्यासंदर्भात अशोकने एबीपी न्यूजशी बोलताना सांगितले होते की, 'मी तिथे असेपर्यंत मला असे कधी वाटले नव्हते. मला काढून टाकण्यापर्यंत मला शंका नव्हती, परंतु त्यानंतर त्याचा एक अंगरक्षक आणि एका अकाउंटंटला काढून टाकले गेले, मग आम्हा तिघांनाही एकच प्रश्न पडला होता की, असे काय घडले की जुना स्टाफ काढला जातोय.' तो पुढे म्हणाला, 'सुशांत सर कधीही जुना स्टाफ काढत नाहीत. पूर्वीसुद्धा लोक जात असत, परंतु ते स्वइच्छेने नोकरी सोडत असत. त्यांच्या जागी दुसरे कर्मचारी आले. पण सरांनी स्वत:हून कधीच कुणाला काढून टाकले नव्हते.'