आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांतने लिहिलेल्या 9 पानांची कहाणी:सुशांतने पावना फॉर्म हाऊसमध्ये लिहिले होते नोट्स; 2018 मध्ये सिगारेट सोडण्याची होती इच्छा; योग, तपश्चर्या, कैलास आणि तिस-या डोळ्याचा उल्लेख

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईतील राहत्या घरातूनही डायरी सापडली होती, ज्यामध्ये 15 पानांमध्ये केदारनाथ आणि भविष्यातील योजनांचा उल्लेख होता.
  • पावना फॉर्महाऊसवर लिहिलेल्या नोट्समध्ये सुशांतने कबीर-मोमीनच्या ओळी लिहिल्या होत्या, वैदिक मंत्र आणि संस्कृतविषयीदेखील लिखाण केले होते.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने लिहिलेल्या काही नोट्स समोर आल्या आहेत. सुशांतने 2018 मध्ये पावना फार्म हाऊसवर या नोट्स लिहिल्याचे दिसून येते. यात सुशांतने आपली दिनचर्या आणि भविष्यातील योजनांचा उल्लेख केला होता. 2018 मध्ये त्याला सिगारेट सोडायची होती, असा उल्लेख यात आहे. त्याची कैलासला जाण्याचीदेखील योजना होती. नोटांमध्ये योग, तपश्चर्या आणि तिसर्‍या डोळ्याचा उल्लेखही सुशांतने केला होता.

इंडिया टुडेकडे या नोट्सची 9 पाने आहेत. रिपोर्टनुसार तो एका ज्योतिषाजवळ जात असल्याचा उल्लेख या नोट्समध्ये आहे. सुशांतने 28 एप्रिल 2018 रोजी केदारनाथची स्क्रिप्ट वाचल्याचे यात लिहिले आहे. त्याच्या दैनंदिन गोष्टींचे 16 मुद्दे देखील त्याने लिहिले. मध्यरात्री अडीच वाजता उठतो. सुपरमॅन चहा पितो आणि थंड शॉवर घेतो, असा उल्लेख सुशांतच्या या नोट्समध्ये आहे.

  • कृतीचा उल्लेख मात्र रियाचे नाव कुठेही नाही

या नोट्समध्ये सुशांतने कृतीसोबत वेळ घालवण्याबद्दलही लिहिले आहे. राब्तामध्ये एकत्र झळकलेले सुशांत आणि कृती रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्याही त्याकाळात चर्चेत होत्या. सुशांतने लिहिले होते की, त्याला त्याची बहीण प्रियांका आणि भावाजो महेशसोबत टूरला जायचे आहे. या नोट्समध्ये रिया चक्रवर्तीचा कुठेही उल्लेख नाही. रिया आणि सुशांतची भेट 2019 मध्ये झाली होती.

  • तिसरा डोळा आणि पीनियल ग्लँडचा उल्लेख

या नोट्समध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कैलास यात्रा. एका पानात सुशांतने या प्रवासाविषयी लिहिले आहे - योग, तपश्चर्या, सोमरस आणि नंतर कैलास. त्याखाली त्याने तिसरा डोळा आणि पीनियल ग्लँड (मेंदूची एक ग्रंथी) याबद्दल देखील लिहिले आहे. एका पानावर टेनिससाठीची वेळ निश्चित केली होती. ही सर्व कामे चार तासांत पूर्ण करण्यासाठी त्याने वेळापत्रक तयार केले होते.

  • मोमीन आणि कबीर यांच्या ओळी लिहिल्या

सुशांतने एका नोटमध्ये लिहिले- जब मैं था, तब हरि नहीं, अब हरि हैं मैं नाहि। हा कबीरचा एक दोहा आहे. याशिवाय मोमीनची ओळ लिहिलेली आहे - तुम मेरे पास होते हो गोया, जब कोई दूसरा नहीं होता.. या व्यतिरिक्त, एनसाएई, नासा आणि सुशांत फॉर एज्युकेशनचा उल्लेखदेखील यात आहे. एनसाएई ही कंपनी सुशांतने वरुण माथुरसमवेत 2018 मध्ये स्थापन केली होती.