आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रणवीरवर सुशांतच्या चाहत्यांचा रोष:रणवीरच्या नव्या जाहिरातीतून सुशांतचा अपमान केल्याचा आरोप, चाहत्यांनी बायकॉट केल्याने कंपनीला द्यावे लागले स्पष्टीकरण

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिंगोवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरु लागल्यानंतर कंपनीच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

अभिनेता रणवीर सिंहची बिंगोची नवी जाहिरात नुकतीच प्रदर्शित झाली आहे. मात्र या जाहिरातीवरुन रणवीरवर टीकेची झोड उठली आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा अपमान झाल्याचे सुशांतच्या चाहत्यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर या जाहिरातीवर बंदी घालण्याची मागणी होत आहे.

नेमके काय आहे जाहिरातीत?
या जाहिरातीमध्ये रणवीर बिंगो खात असून व्हिडिओच्या सुरुवातीला त्याच्या घरी काही पाहुणे आले आहेत. ते रणवीरला त्याच्या भविष्याचे काय प्लान आहेत, असा प्रश्न विचारतात. त्यावर रणवीर बिंगो खातो आणि मार्स, फोटॉन, एलियन या शब्दांचा वापर करत उत्तर देतो. रणवीर म्हणतो, 'पॅराडॉक्सिकल फोटोन ऑफ अतरंगी ऐल्गोरिद्म को E=mc2 में लगाकर इंटरस्टेलर मित्र मंडल कांफ्रेंस के एलियंस की फीलिंग्स मॅच करने का प्लान है', असे उत्तर देत पाहुण्यांचे तोंड बंद करतो.

सोशल मीडिया यूजर्सच्या काय आहेत प्रतिक्रिया?
या जाहिरातीच्या माध्यमातून रणवीरने सुशांतची खिल्ली उडवली आहे, असे नेटक-यांचे म्हणणे आहे. म्हणून त्यांनी रणवीरवर निशाणा साधत जाहिरात बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावरुन रणवीरवर टीका होतेय. एका नेटक-याने लिहिले, "रणवीर सिंह एसएसआरची चेष्टा करण्याची तुझी हिम्मत कशी झाली? तुझा धिक्कार आहे."

आणखी एका नेटक-याने लिहिले, "रणवीर सिंह आणि बिंगो एकत्र मिळून एसएसआरची बघा कशी चेष्टा करत आहेत? त्यांची टॅगलाइन 'ब्रँड भारताचा पण भारताचा अभिमान नाही", अशी पाहिजे."

आणखी एका नेटक-याने प्रतिक्रिया देताना म्हटले की, "रणवीर सिंह तू किती वाईट आहेस? सुशांतशिवाय इतर कुणालाही विज्ञानावर चर्चा करताना ऐकले नाही. तुम्ही लोक त्याची चेष्टा करण्यास काहीच कसर सोडत नाही. किमान त्याच्या आत्म्याचा आदर केला पाहिजे."

कंपनीला द्यावे लागले स्पष्टीकरण
डीएनएच्या वृत्तानुसार, सोशल मीडियावर बिंगोवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरु लागल्यानंतर कंपनीच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आले आहे. कंपनीने सांगितल्यानुसार, सुशांत सिंह राजपूतच्या निधनाच्या आधीच म्हणजे ऑक्टोबर 2019 मध्ये या जाहिरातीचे चित्रीकरण झाले होते. कोरोना महामारीमुळे बिंगो मॅड एंगल्स चीच नाचोज आणि बिंगो मॅड एंगल्स पिज्जाच्या लाँचिंगला उशीर झाला, त्यामुळे ही जाहिरात यावर्षी रिलीज करण्यात आली, असे कंपनीने म्हटले आहे. .

बातम्या आणखी आहेत...