आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत आत्महत्या प्रकरण:सुशांतचे वडील के. के. सिंह यांचा पोलिसांनी जबाब नोंदवला, वडील म्हणाले- 'नैराश्याचे कारण ठाऊक नाही, मात्र तो शांत राहायचा'

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वडिलांनी कोणावरही संशय घेतला नाही.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे वडील के. के. सिंह यांच्या म्हणण्यानुसार त्यांना आपल्या मुलाच्या नैराश्याची जाणीव नव्हती. सिंह यांनी मंगळवारी मुंबई पोलिसांना दिलेल्या आपल्या जबाबात हे सांगितले. पण गेल्या काही दिवसांपासून तो शांत राहात असल्याची त्यांनी कबुली दिली.

रविवारी 34 वर्षीय सुशांत सिंह राजपूतने मुंबईत राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी विलेपार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी सुशांतच्या आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. यासंदर्भात त्यांनी मंगळवारी त्याचे वडील के. के. सिंह यांचा जबाब घेतला.

वडिलांनी कोणावरही संशय घेतला नाही

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, के. के. सिंह म्हणाले की सुशांत डिप्रेशनमध्ये का होता? हे त्यांना ठाऊक नाही. त्यांनी कोणावरही संशय घेतलेला नाही. सुशांत डिप्रेशनमध्ये असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्याच्या घरातून डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आणि औषधे मिळाली आहेत.

क्रिएटिव्ह मॅनेजरची पुन्हा होईल विचारपूस

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते सुशांतच्या फायनान्स, बिझनेस आणि बॉलिवूडमधील त्याच्या प्रोफाइलविषयी त्याचे क्रिएटिव्ह मॅनेजर सिद्धार्थ पीठानीसोबत पुन्हा बातचीत करत आहेत. पोलिसांनी सांगितल्यानुसार, रविवारी त्यांचा प्राथमिक जबाब नोंदवण्यात आला आहे. पण पुन्हा त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे.

दरम्यान, सुशांतच्या कुटुंबीयांनी हत्येची शंका व्यक्त केल्याने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की, या प्रकरणी पोलिस बॉलिवूडमधील व्यावसायिक वैमनस्याच्या दृष्टीनेही तपास करतील. तपासासाठी वांद्रे पोलिस, सीआयडी आणि फॉरेन्सिक विभागाची वेगवेगळी पथके सुशांतच्या वांद्रे येथील घरी गेली होती. डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले की, शवविच्छेदनात मृत्यूचे कारण फाशीमुळे श्वास कोंडल्याचे सांगण्यात आले आहे. पथकाने रिया चक्रवर्ती आणि महेश शेट्टी यांची चौकशी केली.

सुशांतचे एडीजीपी भावोजी म्हणाले- सुशांतच्या मृत्यूत काहीतरी संशयास्पद आहे

सुशांतचे भावोजी आणि हरियाणाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक ओ. पी. सिंह यांनी शंका व्यक्त केली की मृत्यू संशयास्पद आहे. हरियाणा मुख्यमंत्री कार्यालयात विशेष अधिकारी म्हणून नियुक्त ओ. पी. सिंह यांनी प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...