आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांची प्रतिक्रिया:सुशांत सिंह राजपूतचे वडील के. के. सिंह म्हणाले - 2021 मध्ये होणार होते सुशांतचे लग्न, अखेरचे याच विषयावर झाले होते त्याच्याशी बोलणे

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलाच्या फोटोसमोर निराश बसलेले के. के. सिंह, सुशांतच्या प्रार्थना सभेतील हा फोटो आहे. - Divya Marathi
मुलाच्या फोटोसमोर निराश बसलेले के. के. सिंह, सुशांतच्या प्रार्थना सभेतील हा फोटो आहे.
  • एका वेबसाइटशी बोलताना के. के. सिंह यांनी सुशांतच्या मृत्यूनंतर काय घडले हे सांगितले.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर 12 दिवसांनी त्याचे वडील के. के. सिंह यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांचा मुलगा 2021 मध्ये लग्नाचा विचार करणार होता, असे त्यांनी सांगितले. याच विषयावर दोघांचे अखेरचे बोलणे झाले होते. 14 जून रोजी सुशांतने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. नैराश्येतून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. एका वेबसाइटशी बोलताना के. के. सिंह यांनी सुशांतच्या मृत्यूनंतर काय घडले हे सांगितले.  

  • सुशांत म्हणाला होता - आता एक चित्रपट येणार आहे

के. के. सिंह यांनी सांगितले की, सुशांतसोबत त्याच्या लग्नाविषयी चर्चा झाली होती. तो म्हणाला होता की, सध्या कोरोना आहे, त्यानंतर एक चित्रपटही येणार आहे. त्यानंतर फेब्रुवारी-मार्चमध्ये ठरवू लग्न. हेच आमचे अखेरचे बोलणे झाले होते, असे सुशांतच्या वडिलांनी सांगितले.  

  • वडिलांनी दिला होता पसंतीच्या मुलीशी लग्नाचा सल्ला

या मुलाखतीत के. के. सिंह यांनी सुशांतला लग्नासाठी कुठली मुलगी पसंत होती, याचा खुलासा केला नाही. ते म्हणाले, "आम्ही त्याला त्याच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करण्यास सांगितले होते, कारण त्याला त्याचे संपूर्ण आयुष्य तिच्यासोबत घालवायचे होते."

  • केवळ अंकिता लोखंडेबद्दल वडिलांना माहिती होते

के. के. सिंग यांनी सांगितल्यानुसार, सुशांतच्या मैत्रिणींपैकी ते केवळ अंकिता लोखंडेला ओळखत होते. अंकिता मुंबईतच नव्हे तर त्यांना भेटायला पाटण्यातदेखील आल्याचे के. के. सिंह यांनी सांगितले.  'सुशांतच्या अत्यंसंस्काराच्या वेळी चित्रपटसृष्टीतील बरेच कलाकार आहे होते. मात्र त्यापैकी कोणीच माझ्याजवळ येऊन माझी विचारपूस केली नाही. मी तीन दिवस मुंबईत होतो. मात्र या काळात अंकिता लोखंडेव्यतिरिक्त अन्य कोणताच कलाकार आम्हाला भेटायला नाही आला.' असे त्यांनी सांगितले.  

के. के. सिंह पुढे म्हणाले, 'मला रिया चक्रवर्तीविषयी काहीच माहित नव्हते. सुशांतच्या अंत्यसंस्काराच्या वेळी क्रिती सेनॉनसोबत भेट झाली होती, सुशांत एक चांगला मुलगा होता असे ती म्हणाली होती.'

  • 'सुशांतने त्याला काय झाले हे कधीच सांगितले नाही'

के. के. सिंग यांनी या मुलाखतीत सांगितले की, सुशांत लहानपणापासूनच आपल्या भावना उघडपणे व्यक्त करायचा. पण अलिकडच्या वर्षांत तो एकटा राहू लागला होता. पुर्वी सगळं काही सांगायचा पण शेवटच्या काळात काय झाले, हे त्याने कधीही मला सांगितले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.    

बातम्या आणखी आहेत...