आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रद्धांजली:सुशांतला स्पेशल ट्रिब्यूट देतील त्याच्या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक कपूर, सुशांतच्या स्मरणार्थ 3400 गरीब कुटुंबांना देणार जेवण

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिषेक कपूर यांच्या 'काय पो चे' या चित्रपटातून सुशांतने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

सुशांत सिंह राजपूतचा पहिला चित्रपट 'काय पो चे' (2013) चे दिग्दर्शक अभिषेक कपूर त्याला खास श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. अभिषेकची पत्नी प्रज्ञा कपूरची एनजीओ 'एक साथ: द अर्थ फाउंडेशन'च्या माध्यमातून 3,400 गरीब कुटुंबांना जेवण दिले जाणार आहे. 

इंस्टाग्रामवर ही माहिती देताना प्रज्ञाने लिहिले की, 'सुशांतच्या स्मृतीत एक साथ फाऊंडेशन 3400 गरीब कुटुंबांना जेवण देणार आहे. लॉकडाउन संपले असले तरी लोकांजवळ नोकरी नाही आणि उत्पन्नदेखील संपत आहे. त्यामुळे आमचे प्रयत्न सुरूच राहतील,' असे प्रज्ञा म्हणाली. 

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये प्रज्ञाने लिहिले की, तुझी उणीव कायम भासेल सुशांत. याआधी, 14 जून रोजी प्रज्ञाने सुशांतच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत लिहिले होते की, 'मला धक्का बसला असून खूप संताप आला आहे. ही एक हृदयद्रावक घटना आहे. तू कायम खास राहशील सुशांत.'

अभिषेकनेदेखील सुशांतचे स्मरण केले : सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी अभिषेकने त्याला श्रद्धांजली वाहताना लिहिले की, 'माझ्या मित्राच्या निधनामुळे अतिशय दुःखी असून मला मोठा धक्का बसला आहे. आम्ही एकत्र दोन अतिशय विशेष चित्रपट केले. तो एक चांगला अभिनेता होता, तो आपल्या प्रत्येक पात्रात जीव ओतण्यासाठी खूप कष्ट घ्यायचा. मला तुझी कायम आठवण येईल भावा, अशी भावूक पोस्ट अभिषेक कपूरने लिहिली होती.  

अभिषेकने सुशांतसोबत काय पो चे व्यतिरिक्त 2018 मध्ये आलेला केदारनाथ बनवला होता. सारा अली खानने या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.

View this post on Instagram

🙏🏽💔 #sushantsinghrajput #gonetoosoon

A post shared by Abhishek kapoor (@gattukapoor) on Jun 14, 2020 at 4:47am PDT

सुशांत अखेरचा 'ड्राइव्ह' चित्रपटात दिसला होता. दोन वर्षे लटकल्यानंतर हा चित्रपट मार्चमध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. सुशांतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचरा’ आहे जो या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...