आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत आत्महत्या प्रकरण:सुशांतच्या माजी ड्रायव्हरचा रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप - तिने त्याच्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवले होते, तो आजारी असताना घरी पार्टी करायची

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका वृत्तवाहिनीशी बोलताना धीरेनने हा खुलासा केला.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी त्याचा माजी ड्रायव्हर धीरेनने रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले आहेत. धीरेनच्या म्हणण्यानुसार, रियाने सुशांतवर पूर्णपणे नियंत्रण ठेवले होते. धीरेनने सांगितले की, त्याने काम सोडल्यानंतर अनेकांनी त्याला सांगितले होते की, सुशांत आजारी असतानाही रिया घरी पार्टी करत असे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना धीरेनने हा खुलासा केला.

रियाने सुशांतचा स्टाफ काढला होता

टाइम्स नाऊशी बोलताना धीरेनने सांगितले की, सुशांतच्या आयुष्यात येताच रियाने स्वतःची माणसे कामावर ठेवण्यासाठी त्याच्या सर्व कर्मचा-यांना कामावरुन काढून टाकायला सुरुवात केली होती. यादरम्यान त्याने सुशांतची बहीण प्रियांका आणि रिया यांच्यातील भांडणाबद्दलही सांगितले. त्याने सांगितले की एकदा तो रिया, तिचा भाऊ शोविक आणि प्रियांकाला एका क्लबमध्ये घेऊन गेला होता, तेथे एक पार्टी होती. तिथून परत आल्यावर प्रियांका अचानक दिल्लीला तिच्या घरी परतली. धीरेनच्या म्हणण्यानुसार, त्या रात्री रिया आणि प्रियांकामध्ये भांडण झाले होते.

महत्त्वाचे म्हणजे, रियाने 2019 मध्ये प्रियांकावर विनयभंग केल्याचा आरोप केल्याचे काही दिवसांपूर्वीच समोर आले होते. यानंतर सुशांत आणि प्रियांकामध्ये भांडण झाले आणि प्रियांका दिल्लीला परतली होती. त्यानंतर काही महिने सुशांत आणि प्रियांका यांच्यात काहीच बातचित झाली नव्हती. नंतर सुशांतने प्रियांकाची माफी मागितली होती. तोपर्यंत सुशांतच्या लक्षात आले होते की, रियाने बहीणभावात मतभेद निर्माण करण्याच्या उद्देशाने असा गंभीर आरोप केला होता.

सुशांतसोबत ड्रायव्हर15-16 तास राहायचा

आणखी एका रिपोर्टमध्ये सुशांतच्या दुसर्‍या ड्रायव्हर अनिलशी संवाद झाल्याचा दावा केला आहे. अनिलने सांगितले की, तो सुशांतसोबत 15 - 16 तास राहायचा. तो सुशांतला शूटवर घेऊन जायचा आणि जर त्याला काही हवे असेल तर ते त्याच्यापर्यंत पोहोचवायचा.

अनिलच्या म्हणण्यानुसार, त्याने 2018 मध्ये सुशांतसोबत अडीच महिने काम केले होते. यानंतर त्याला आणि उर्वरित कर्मचार्‍यांना अचानक काढून टाकण्यात आले होते. त्यांना यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. अनिलच्या म्हणण्यानुसार, त्याला तारीख व्यवस्थित आठवत नाही. पण सुशांतच्या 'केदारनाथ' चित्रपटाच्या रिलीजच्या आसपासची ही घटना आहे. त्यानंतर सुशांतने 'छिछोरे' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली होती.

सुशांत मृत्यूला घाबरला होता

अनिलने या बातचितमध्ये एका घटनेचा उल्लेख केला. त्याने सांगितल्यानुसार, सुशांतला मृत्यूची भीती वाटत होती. अनिलने सांगितले, एकदा तो सुशांतसोबत होता, आणि तेथून परत येण्यास थोडा उशीर झाला होता. सुशांतची वाट पाहात असताना अनिलचा डोळा लागला आणि तो गाडीत झोपला होता. जेव्हा सुशांत तिथे आला तेव्हा तो झोपला होता.

सुशांतने विचारले- झोपतोय का का? अनिलने याव​​​​​​​र नाही असे उत्तर दिले. सुशांतने अनिलला कार चालवू नको असे सांगितले आणि तो स्वतः गाडी चालवत घरी परतला होता. तर अनिल दुसर्‍या कारने परतला होता. अनिलच्या सांगण्यानुसार, गाडी चालवताना अचानक माझा डोळा लागला तर अपघात होईल, अशी भीती सुशांतला वाटली होती, म्हणून त्याने अनिलला कार चालवू दिली नव्हती. जी व्यक्ती मृत्युला घाबरायची, ती आत्महत्या करु शकत नाही, असे अनिलने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...