आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण:इशा-यानंतरही RTI कडून मिळाले नाही उत्तर, आता CBI ऑफिससमोर आंदोलन करतोय SSR चा मित्र गणेश हिवारकर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील अपडेट जाणून घेण्यासाठी गणेश हिवारकरने 15 मे रोजी RTI दाखल केला होता.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या पहिल्या स्मृतीदिनी त्याचा मित्र आणि नृत्यदिग्दर्शक गणेश हिवारकर दिल्लीत सीबीआयच्या मुख्यालयासमोर आंदोलन करत आहे. केंद्रीय अन्वेषण यंत्रणा आतापर्यंत या प्रकरणात कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचली नाही, यावर त्याने नाराज व्यक्त केली आहे.

भास्करसोबतच्या खास बातचीतमध्ये गणेश म्हणाला, “दिवसा मुख्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाईल आणि संध्याकाळी कँडल मार्च काढला जाईल. सीबीआयने आतापर्यंत या प्रकरणातील कोणतीही माहिती उघड केलेली नाही. तसेच आरटीआय दाखल करण्यात आले होते. त्याचेही सीबीआयकडून अद्याप कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. अशा परिस्थितीत आंदोलनाशिवाय दुसरा कोणताही मार्ग नव्हता. सीबीआयला आता या विषयावर आपले मौन मोडावे लागेल," असे त्याने सांगितले. गणेशने आंदोलन सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत.

गेल्या महिन्यात दिला होता इशारा
या प्रकरणातील अपडेट जाणून घेण्यासाठी गणेश हिवारकरने 15 मे रोजी आरटीआय दाखल केला होता, ज्याला सीबीआयने प्रतिसाद दिला नाही. सुशांतच्या पहिल्या पुण्यतिथीपर्यंत उत्तर मिळाले नाही, तर तो एजन्सीच्या कार्यालयासमोर आंदोलन करेल. अशा इशारा गणेशने 28 मे रोजी सीबीआयला दिला होता.

'सिद्धार्थ पिठानीवर सीबीआयने कारवाई करावी'
गेल्या महिन्यात सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठानीला अटक झाल्यानंतर भास्करशी झालेल्या संभाषणात गणेश म्हणाला होता, "एनसीबी (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) उघडपणे काम करते. त्यांनी सिद्धार्थ पिठानी (सुशांतचा मित्र आणि रुममेट) ला अटक केली. परंतु एनसीबी केवळ ड्रग्ज अँगलअंतर्गत त्याचा गुन्हा उघड करू शकते. आता सीबीआयनेदेखील पिठानीविरोधात कारवाई करण्याची गरज आहे. संशयित म्हणून त्यांनी कुणाकुणाचा जबाब नोंदवला? आरोपींविरोधात चार्जशीट कधीपर्यंत दाखल केली जाईल? सीबीआय याला हत्या की आत्महत्या मानत आहे? यंत्रणेकडून आत्तापर्यंत कोणतीही कारवाई का केली गेली नाही याचे कारणही स्पष्ट करावे,"असे प्रश्न गणेशने उपस्थित केले आहेत.

14 जून 2020 रोजी झाला होता सुशांतचा मृत्यू
सुशांत सिंह राजपूत 14 जून 2020 रोजी त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत सापडला होता. मुंबई पोलिसांनी प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे म्हटले होते. मात्र, सुमारे दीड महिन्यानंतर सुशांतचे वडील केके सिंह यांनी सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांविरूद्ध पाटण्यात एफआयआर दाखल केला होता. सिंह यांनी रियाविरोधात सुशांतच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल आणि त्याच्या बँक खात्यातून 15 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. हा तपास नंतर सीबीआयकडे सोपविण्यात आला. सीबीआयला सहकार्य करणा-या एम्सने या प्रकरणात हत्येची शक्यता नाकारून एजन्सीला अहवाल सादर केला आहे. मात्र, सीबीआयचा तपास अद्याप सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...