आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून सुशांत सिंह राजपूतच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुकेश सुशांतचा जवळचा मित्र होता. सुशांतच्या मृत्यूची बातमी समजातच सर्वात पहिले मुकेश त्याच्या घरी पोहोचले होते.
मुकेशने सुशांतची आठवण काढत लिहिले, सुशांत माझ्या भावासारखा होता. जे काही घडले ते अतिशय दुर्दैवी आहे जे मी शब्दात व्यक्त करु शकत नाही.
'सुशांत अंतर्मुख होता, पण तो खूप हुशार आणि प्रतिभावान होता. इंडस्ट्रीने असे रत्न गमावले आहेत, त्याची भरपाई कधीच होऊ शकत नाही. मला धक्का बसला आहे. अजूनही माझा यावर विश्वासच बसत नाहीये. आमची कधीही न संपणारी चर्चा कायमची थांबली आहे. मी आशा करतो की, आता तू एका चांगल्या टिकाणी असशील. तुझी कायम उणीव भासेल. तुझ्यावर कामय प्रेम करत राहिल माझ्या भावा', अशा शब्दांत मुकेश यांनी सुशांतला आदरांजली वाहिली आहे.
मुकेश यांनी माध्यमांना विनंती केली
रविवारी सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी मुकेश यांनी माध्यमांना विनंती केली की, त्यांना प्रायव्हसी हवी असून सध्या ते सुशांतच्या मृत्यूविषयी काहीही बोलू इच्छित नाही.
मुकेश यांनी सोशल मीडियावर लिहिले होते, 'प्रिय पत्रकार, हे माझे वैयक्तिक नुकसान आहे, ज्याने मी पुरता खचून गेलो आहे. यातून सावरण्यास मला थोडा वेळ लागेल. कृपया मला कॉल करू नका किंवा मेसेज पाठवू नका. माझा ताण वाढत आहे. मी काही दिवस बोलण्याची स्थितीत नाही. धन्यवाद.'
View this post on InstagramA post shared by Mukesh Chhabra CSA (@castingchhabra) on Jun 14, 2020 at 7:13am PDT
मुकेश सुशांतच्या शेवटच्या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत : मुकेश या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होणा-या 'दिल बेचारा' या चित्रपटाचा दिग्दर्शकही आहे. या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. या चित्रपटात सुशांत सिंह राजपूत आणि संजना सांघी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सुशांतचा हा शेवटचा चित्रपट ठरला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.