आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुलाखतीत खुलासा :मित्र संदीप म्हणाला - 'सुशांतच्या मृत्यूनंतर मला अनेक मेसेज आले, आम्ही खूप शक्तिशाली लोक आहोत, तू आम्हाला अंत्यसंस्कारासाठी का बोलावले नाही?'

मुंबई6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतच्या मृत्यूपेक्षाही लोक करत असलेल्या कृतीतून मला अतिशय वाईट वाटतंय, असं संदीप म्हणाला आहे.

दिवंगत सुशांत सिंह राजपूतचा  निर्माता संदीप सिंह  जवळचा मित्र आणि रुममेटदेखील होता. त्याच्या मृत्यूने संदीपला तीव्र धक्का बसला आहे. सुशांतशी संबंधित अनेक आठवणी तो सतत सोशल मीडियावर शेअर करतोय. अलीकडेच त्याने एका मुलाखतीत सुशांतबद्दलच्या बर्‍याच गोष्टी शेअर केल्या आहेत.

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत संदीप म्हणाला, 'सुशांतच्या मृत्यूचा लोकांनी तमाशा उभा केला आहे. मी जेव्हा त्याच्या अंत्यसंस्कारानंतर घरी पोहोचलो तेव्हा मला काही फोन कॉल्स व मेसेजेस आले. आणि त्यात आम्हाला अंत्यसंस्काराचे 'इनव्हाइट' का पाठवले नाही असे विचारले होते. काही मेसेजमध्ये लिहिले होते, आम्ही खूप शक्तिशाली लोक आहोत, तू आम्हाला का बोलावले नाही." या सर्व लोकांच्या मनात काय चालले आहे? हे धक्कादायक आहे, असे संदीपने म्हटले आहे. 

संदीप पुढे म्हणाला, 'एकता कपूरला वादाच्या भोव-यात ओढले गेले, पण ती स्वत:हून अंत्यसंस्कारात सहभागी झाली होती. श्रद्धा कपूर, रणदीप हूडा, हे सर्व लोक तिथे आले आणि पावसात उभे होते, रडत होते. सुशांतच्या मृत्यूपेक्षाही लोक करत असलेल्या कृतीतून मला अतिशय वाईट वाटतंय.'

कुटुंबाला एकटे सोडा: संदीप पुढे म्हणाला, 'काही लोक ब्लेम गेम खेळत आहेत पण कुणालाही कुटुंबाची चिंता नाही. त्याच्या कुटुंबियांना जरा एकटे सोडा. त्याच्या कुटुंबाचा जरा विचार करा. त्याच्यासारख्या एका यशस्वी व्यक्तीने हे पाऊल उचलले, हे खूप वेदनादायक आहे. सुशांतला सात चित्रपटांमधून काढून टाकण्यात आले होते, असे काही लोक म्हणत आहेत, तर काहींनी त्याच्या रिलेशनशिपवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कुणी त्याच्याकडे पैसे नव्हते, असे म्हणत आहेत, परंतु हे सर्व तर्कवितर्क आहेत', असे संदीप म्हणाला. 

0