आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत मृत्यू प्रकरण:जिम पार्टनरचा दावा - शाहरुखने सुशांतला अवॉर्ड शोमध्ये बोलावून अपमानित केले होते, सलमान आणि करणनेही उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचले

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुनीलने सांगितले - सुशांतला कोणताही चित्रपट मिळू नये यासाठी करण जोहरने सलमानसोबत मिळून षडयंत्र रचले होते
  • सुनीलने सांगितले, शाहरुख म्हणाला होता की, तो त्याच्यासोबत करिअर आणि स्ट्रगलवर बातचित करतील पण अवॉर्ड शोमध्ये सुशांतचा अपमान केला

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सतत नवीन दावे समोर येत आहेत. आता स्वतः त्याचा जिम पार्टनर सुनील शुक्लाने म्हटले की, सुशांतला इंडस्ट्रीमध्ये सातत्याने अपमानित केले जात होते. त्याच्या आरोपांविषयी त्याने वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली आहे. यासोबतच हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी सुप्रीम कोर्टाकडे केली आहे.

सुनीलने म्हटले की, सुशांतच्या फिल्मी करिअरला संपवण्याचा काही लोक सातत्याने प्रयत्न करत होते. तो म्हणाला की, कशा प्रकारे एका अवॉर्ड शोमध्ये शाहरुखने त्याला धोक्याने बोलावले आणि त्याचा अपमान केला होता. तसेच तो म्हणाला की, सलमान आणि करणने मिळून त्याचे करिअर उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचले होते.

सुशांतचा जिम पार्टनर होता सुनील
सुनीलने सांगितल्यानुसार, तो सुशांतचा जिम पार्टनर होता. सुशांत नेहमीच त्याच्या मनातल्या गोष्टी शेअर करत असतं. सुनीलने सांगितले की, आयफा अवॉर्ड्स दरम्यान शाहरुखने सुशांतला स्टेजवर बोलवून त्याचा अपमान केला होता.

त्याने दावा केला की, आयफा अवॉर्ड्समध्ये सुशांत जेव्हा शाहरुख आणि शाहिदसोबत स्टेज शेअर करणार होता. तेव्हा शोपूर्वी शाहरुखने त्याच्याशी बोलताना म्हटले होते की, तो त्याच्यासोबत 'काय पो चे' विषयी बातचित करतील. यासाठी त्याने एक सिग्नेचर स्टेपची प्रॅक्सिस करण्यास सांगितले होते. सुशांत यासाठी खूप आनंदी होता.

सुनीलने सांगितले की, एवढेच नाही तर शाहरुने त्याला हे देखील म्हटले होते की, ते त्याच्या करिअर आणि स्ट्रगलविषयी बातचित करतील. मात्र स्जेटवर गेल्यावर त्यांनी सुशांतचा अपमान करण्यास सुरुवात केली. शाहरुखच्या अशा वागण्याचे सुशांतला खूप वाईट वाटले होते. सुशांतने जिममध्ये येऊन म्हटले होते की, मी तेथे गेलो, माझ्यासोबत खूप वाईट घडले, त्यांनी माझा खूप अपमान केला.

सलमान आणि करणने कट रचला
सुनीलने सांगितले की, करण जोहर आणि सलमानने मिळून कट रचला होता की, सुशांतला कोणताही चित्रपट मिळू नये. त्याने सांगितले की, करणनने सुशांत आणि जॅकलीनला 'ड्राइव्ह' चित्रपटासाठी साइन केले होते. मात्र याच काळात जॅकलीनला रेस-3 मध्ये काम करण्याची संधी मिळाली. करणने सुशांतला दुसरी कोणतीच फिल्म साइन करु दिली नाही. मात्र जॅकलीनला सलमानच्या फिल्ममध्ये काम करु दिले. यामुळे ड्राइव्हच्या शूटिंगला उशीर झाला.

बातम्या आणखी आहेत...