आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांतच्या आठवणीत:सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर इंस्टाग्राम अकाऊंटवर झाला महत्त्वाचा बदल, आता Remembering शब्द लिहिलेला दिसेल

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतने शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ इंस्टाग्रामवर कायम दिसतील.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी मुंबईतील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या अकाली एक्झिटने सारेच हळहळले आहेत. सुशांतने एवढे टोकाचे पाऊल का उचलले हाच प्रश्न सगळ्यांच्या मनात उपस्थित झाला आहे. आता इंस्टाग्राम या सोशल मीडिया अॅपने सुशांतच्या अकाऊंटमध्ये एक खास बदल केला आहे. त्याच्या  अकाऊंटचे मेमोरियल अकाऊंटमध्ये रूपांतर केले आहे. इंस्टाग्रामने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर Remembering असा टॅग अ‍ॅड केला.  

सुशांतने 3 जून रोजी इंस्टाग्रामवर आपल्या आईचा एक फोटो शेअर केला होता. ही त्याचे शेवटची पोस्ट होती. इंस्टाग्रामकडून Remembering हा टॅग प्रत्येक मृत व्यक्तीच्या अकाऊंटला दिला जात नाही. काही खास लोक आणि चिरकाळ स्मरणात राहाव्यात अशा व्यक्तींच्याच निधनानंतर त्यांच्या अकाऊंटला हा टॅग दिला जातो.

अकाऊंट मेमोरियल झाल्यानंतर पुढे काय?

आता सुशांतचे अकाऊंट इतर कुणीही लॉग इन करु शकणार नाही. कुणीही त्याच्या अकाऊंटवरील पोस्टमध्ये कुठलाही बदल करु शकणार नाही. सुशांत सिंह राजपूतच्या नावाखाली आता Remembering हा टॅग दिसून येईल. सुशांतने शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ इंस्टाग्रामवर कायम दिसतील.  

सुशांतच्या पोस्टवरील कमेंट्स आणि त्याच्याद्वारे इतर पोस्टवर केल्या गेलेल्या कमेंट्स पूर्वीसारख्याच दिसतील. सुशांतचा सध्याचा प्रोफाईल फोटो आणि ज्याला तो फॉलो करायचे त्यातही कुठला बदल केला जाऊ शकणार नाही.  एक्सप्लॉर सारख्या काही ठिकाणी इंस्टाग्राम मेमोरियलाइज्ड अकाऊंट दिसत नाहीत. सुशांत सिंहच्या अकाऊंटवर सध्याच्या पोस्टची संख्या 87 आहे. त्याचे 1 कोटी 27 लाख 82 हजार  सातशे 70 फॉलोअर्स आहेत. तर  सुशांतने 6 हजार सातशे 31 जणांना फॉलो केले होते.

बातम्या आणखी आहेत...