आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपकमिंग:सुशांतच्या शेवटच्या चित्रपटातील को-स्टार संजना सांघीला मिळाला मोठ्या बजेटचा चित्रपट, 'ओम' या अ‍ॅक्शन ड्रामात आदित्य कपूरसोबत झळकणार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • संजनाने 'ओम' हा चित्रपट साइन केला आहे.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचार' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी संजना सांघी हिला मोठ्या बजेटचा चित्रपट मिळाला आहे. अहमद खानच्या अ‍ॅक्शन ड्रामा 'ओम'मध्ये संजना आदित्य रॉय कपूरसोबत झळकणार आहे. आदित्यने चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. या चित्रपटासाठी संजनाच्या आधी तारा सुतारिया, दिशा पाटनी यांच्या नावांची चर्चा होती.

संजना करणार जबरदस्त अ‍ॅक्शन

सूत्रांच्या माहितीनुसार अहमद नवीन चेह-याचा शोध घेत होते. त्यांना फ्रेश फेस हवा होता, शिवाय आदित्यसोबतची अभिनेत्रीची केमिस्ट्रीदेखील जुळणारी हवी होती. त्यांना संजना या भूमिकेसाठी परफेक्ट वाटली. संजना आदित्यच्या प्रेयसीची भूमिका वठवणार असून चित्रपटात अ‍ॅक्शन सीन्स करताना दिसणार आहे. संजनाने 'ओम' हा चित्रपट साइन केला आहे.

2021 च्या सुरुवातीला अहमद यांना हा चित्रपट पूर्ण करायचा आहे. त्यामुळे ते तारा आणि दिशाच्या तारखांची वाट बघू शकत नव्हते. कारण या दोघीही दुस-या चित्रपटांमध्ये बिझी आहेत. तर संजनाच्या हातात सध्या दुसरा कुठलाही मोठा चित्रपट नव्हता.