आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिल बेचारा:सुशांत सिंह राजपूतच्या शेवटच्या चित्रपटाने केला विक्रम,  IMDB वर सर्वाधिक रेटिंगच्या रुपात मिळाले 10 पैकी 9.8 स्टार

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांत सिंह राजपूतच्या निधनाच्या 40 दिवसानंतर 'दिल बेचारा' हा त्याचा शेवटचा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित करण्यात आला.
  • अर्ध्या तासाच्या आत चित्रपटाला IMDB वर 21 हजार मते मिळाली आणि त्याचे रेटिंग 10 पैकी 10 स्टार होते.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ला जगातील सर्वात मोठी रेटिंग ऑथिरिटी आयएमडीबीवर आतापर्यंतची सर्वाधिक रेटिंग मिळाली आहे. चित्रपटला 10 पैकी सरासरी 9.8 स्टार मिळाले आहेत. एकूण (शनिवारी दुपारी 3:05 पर्यंत) 31,284 आयएमडीबी यूजर्सपैकी 92.7% टक्के म्हणजेच 28,991 यूजर्सनी चित्रपटाला 10 पैकी 10 स्टार दिले आहेत. तर 2.3 टक्के म्हणजेच 727 यूजर्सनी 10 पैकी 9 आणि सर्वात कमी एक स्टार 1.3 टक्के (411) यूजर्सनी दिला आहे. रिपोर्टनुसार चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर वेबसाइटवर अर्ध्या तासात 21 हजार यूजर्सनी रिव्ह्यू दिला होता आणि त्याचे रेटिंग 100 टक्के म्हणजेच 10 पैकी 10 स्टार होते.

  • क्रॅश झाले होते हॉट स्टार

बातमीनुसार शुक्रवारी हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर चित्रपट बघण्यासाठी यूजर्सची संख्या इतकी जास्त होती की डिस्ने प्लस हॉट स्टार क्रॅश झाला. चित्रपट निर्माता हंसल मेहता यांनी रात्री 9:36 वाजता ट्विट करुन ही माहिती दिली. त्यांनी लिहिले, "आणि हॉट स्टार क्रॅश झाला." मेहता यांच्या टि्वटला प्रत्युत्तर देताना, इतर अनेक यूजर्सनीही त्यांना अशीच समस्या आल्याचे सांगितले.

  • मुकेश छाबरांचा पहिला चित्रपट आणि हॉलिवूडचा रिमेक

'दिल बेचारा' हा कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट आहे. सुशांतशिवाय संजना सांघीची यात महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटामध्ये सैफ अली खानचा कॅमिओ आहे. सुशांतच्या निधनानंतर (14 जून) 40 दिवसांनी हा चित्रपट प्रदर्शित झाला.

  • ही आहे 'दिल बेचारा' ची कहाणी

'दिल बेचारा' हा 'द फॉल्ट इन अवर स्टार्स' या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे. स्वत: गंभीर आजाराने ग्रस्त असूनही आनंदाने आयुष्य जगत दुसऱ्या व्यक्तीलाही आयुष्य जगायला शिकवणाऱ्या मॅनी (सुशांत सिंह राजपूत)ची ही कहाणी. किझी बासू (संजना सांघी) हिला थायरॉइड कॅन्सर असतो. तिच्या आयुष्यात डान्सर इम्मानुअल राजकुमार ज्युनिअर उर्फ मॅनीची एंट्री होते. मॅनी हा हसतमुख आणि बिनधास्त स्वभावाचा असतो, तर किझी तितकीच गंभीर आणि शांत असते. किझीचं दुःख कमी करण्यासाठी मॅनी त्याच्या परीने सर्व प्रयत्न करतो. तिला आयुष्याचं खरं महत्त्व समजावून सांगतो. तिच्या जगण्याला तो कारण बनतो. विशेष म्हणजे मॅनीलाही कॅन्सर असतो आणि आजारपणामुळे त्याला त्याचा एक पाय गमवावा लागतो. मात्र तो आयुष्य आनंदाने जगतो. किझीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो तिला पॅरिसला घेऊन जातो. मॅनीच्या आयुष्यात जशी किझीची एंट्री होते, तसाच तो कायमचा निघूनही जातो. त्याचा मृत्यू होतो. मात्र तो जाताना किझीला जगणं शिकवून जातो. अगदी हसवत हसवत हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून जातो.