आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांतचा शेवटचा चित्रपट :डिस्ने प्लस हॉटस्टारची सुशांतला श्रद्धांजली, 24 जुलै रोजी रिलीज होणार 'दिल बेचारा', ओटीटी प्लॅटफॉर्मवर विनामूल्य पाहता येणार  

मुंबई7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डिस्ने प्लस हॉटस्टारने हा चित्रपट सब्सक्राइबर्स आणि नॉन-सब्सक्राइबर्ससाठी मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

14 जून रोजी या जगाचा कायमच निरोप घेणा-या सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट दिल बेचाराची रिलीज डेट समोर आली आहे. येत्या 24 जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर या चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे. खास गोष्ट म्हणजे डिस्ने प्लस हॉटस्टारने सुशांतला श्रद्धांजली म्हणून हा चित्रपट सर्व सब्सक्राइबर्स आणि नॉन-सब्सक्राइबर्ससाठी मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. 

  • हॉटस्टारने वाहिली श्रद्धांजली 

चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करत डिस्ने प्लस हॉटस्टारने लिहिले, "प्रेम, आशा आणि अंतहीन आठवणींची कहाणी. दिवंगत सुशांत सिंह राजपूतच्या आठवणी... प्रत्येकाच्या हृदयात नेहमी राहतील.. 'दिल बेचारा' 24 जुलै रोजी येतोय."

  • सर्व सब्सक्राइबर्स आणि नॉन-सब्सक्राइबर्ससाठी उपलब्ध राहणार 

कास्टिंग डायरेक्टरहून चित्रपट दिग्दर्शक झालेल्या मुकेश छाबरांचा हा पहिला चित्रपट आहे. 'रॉकस्टार' फेम संजना सांघी सुशांतसोबत या चित्रपट मेन लीडमध्ये आहे. त्यांनी आपल्या  सोशल मीडियावर चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करताना लिहिले की, "सुशांतच्या प्रेमासाठी आणि त्याच्या सिनेमावर असलेल्या प्रेमापोटी हा चित्रपट सर्व ग्राहक आणि विना-ग्राहकांना उपलब्ध होईल."

 

  • 'द फॉल्ट इन अवर स्टार्स'वर आधारित आहे चित्रपट

मुकेश छाबरा यांनी मार्च 2018 मध्ये या चित्रपटाची घोषणा केली होती. हा चित्रपट 2012 मध्ये आलेल्या जॉन ग्रीकच्या 'द फॉल्ट इन अवर स्टार्स' या कादंबरीवर आधारित आहे. हा चित्रपट 29 नोव्हेंबर, 2019 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार होता. परंतु काही कारणास्तव, त्याची रिलीज डेट 8 मे 2020 ही निश्चित करण्यात आली. दरम्यान, कोरोनाव्हायरसचा उद्रेक झाल्यामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला आणि थिएटर बंद पडले. त्यामुळे चित्रपट मोठ्या स्क्रीनपर्यंत पोहोचू शकला नाही.

0