आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

धक्कादायक:सुशांतच्या शेवटच्या चित्रपटाची नायिका संजनाने कायमची मुंबई सोडण्याचा दिला इशारा, पोलिसांकडून 9 तास झाली होती चौकशी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • संजना बुधवारी मुंबईहून दिल्लीला परतली आहे.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचार'ची अभिनेत्री संजना सांघी बुधवारी मुंबईहून दिल्लीला परतली आहे. त्याचबरोबर, आता ती कदाचित मुंबईत परतणार नसल्याचेही तिने संकेत दिले आहेत. विमानात चढण्यापूर्वी तिने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 वरून लिहिलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये हे सांगितले आहे. तिच्या मते, मी मुंबईबद्दल जे ऐकले होते, तशी ती नाही.

बुधवारी संजनाने तिच्या इंस्टा स्टोरीमध्ये लिहिले, 'खुदा हाफिज मुंबई. आपण 4 महिन्यांनंतर तुमचे दर्शन घडले. मी दिल्लीला परतत आहे. आपले रस्ते काहीसे वेगळे भासले, ते निर्जन होते, कदाचित माझ्या अंत:करणातील दु:खामुळे माझा दृष्टीकोन बदलत आहे. किंवा कदाचित याक्षणी आपण देखील थोडे दु: खी आहात.  पुन्हा भेटू लवकर? किंवा कदाचित नाही', अशा आशयाची पोस्ट तिने शेअर केली आहे. 

  • मंगळवारी पोलिसांनी 9 तास चौकशी केली

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी मंगळवारी वांद्रे पोलिस ठाण्यात संजना सांघीची पोलिसांनी सुमारे 9 तास चौकशी केली.  चौकशीत पोलिसांनी 'दिल बेचारा' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सुशांतवर ‘मीटू’ प्रकरणात झालेले आरोप, चित्रीकरण सुरु असताना त्याला डिप्रेशन आले होते का, असे  अनेक महत्त्वाचे प्रश्न संजना सांघी हिला विचारले. 

  • सुशांतवर मीटूचा आरोप लावला नव्हता

संजनाच्या दाव्यानुसार तिने सुशांतसिंह राजपूतवर कोणत्याही प्रकारचा आरोप केला नव्हता किंवा अशी कोणतीही घटना घडली नव्हती. याविषयी ती म्हणाली, '2018 मध्ये जेव्हा मीटू मोहीम सुरु होती, तेव्हा कुणीतरी अशी अफवा उठवली की, शूटिंग दरम्यान सुशांतने चुकीच्या पद्धतीने मला हात लावला, मात्र तसे काही झालेच नव्हते. पण मला याबद्दल त्यावेळी काहीच माहिती नव्हती. चित्रपटाच्या एका भागाचे शूटिंग झाले होते. माझे शूट नसल्याने मी आईबरोबर अमेरिकेला गेले होते', अशी माहिती संजनाने पोलिसांना दिली.

View this post on Instagram

#DilBecharaOnAnyScreen A personal note: Aaj kal, ek alag nazariye se sab kuch dekhne ki koshish kar rahi hoon, socha aap sab ke saath bhi thodi baat kar loon. Iss samay, dard kaafi hai. Aur badhate nahi hai na? Yeh sab akele karna, mushkil kaafi hai. Apne aap ko, iss zidd se, riha kar dete hai na? In mushkilon, ko thoda asaan kar dete hai na. Let’s make this a time to celebrate a legendary life, a film? A time to give a tribute, to embrace these extremely challenging circumstances we all are in. And not a time to revolt, asking for something that in our present reality cannot be made possible. Bloockbuster banani hai, toh apke pyaar se hi ban jayegi!❤️Hamesha Box office ki zarurat toh nahi hain na? Let NOT make it about the size of the screen we get to watch this labour of love on, his last, and in my humble belief, his finest. Let’s instead make it about the size of our hearts, that we can make as big as we wish to, and fill up with as much love, joy and pride as we want. Let’s cherish it. Relish it. Celebrate it. In any and every way we can? Socha agar moral support hee dena hai, toh shayad #DilBecharaOnAnyScreen ki thaan lo? ✅ Aur #DilBecharaOnBigScreen ko abhi ke liye, bhool jao? Aur jahan rahi intezaar karne ki baat. Intezaar toh mahino se kar rahe hain, taqleefon se guzar rahe hain. Ab film dekhne ka time, aur yaadon mein beh jaane ka time, aa gaya hai. Itna pyaar hai aapke paas dene ke liye, bas unconditionally de do? Dukh bahut zyaada hai, thodi si khushi ka mauka hee de do na. 🙏 . . . #SushantSinghRajput Thank you for helping me put this together @hubhopperofficial

A post shared by Sanjana Sanghi (@sanjanasanghi96) on Jun 26, 2020 at 2:42am PDT

  • डिजिटल रिलीजला विरोध न करण्याचे आवाहन केले

संजनाने यापूर्वी रविवारी इंस्टाग्रामवर एक व्हॉईस मेसेज शेअर करून 'दिल बेचार' या चित्रपटाच्या डिजिटल प्रदर्शनाला विरोध न करण्याची विनंती केली होती. संजनाने व्हॉईस मेसेजमध्ये म्हटले होते, 'पुन्हा एकदा सुशांतला पडद्यावर  बघण्याची इच्छा माझ्या मनाला स्पर्शून गेली. चित्रपटाच्या संपूर्ण टीमने अडीच वर्षे खूप घाम गाळला आहे. आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा चित्रपट आवडेल.'

संजना म्हणाली होती, 'अर्थातच हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होण्यासाठी तयार करण्यात आला होता, पण 8 मे रोजी कोरोना साथीचा रोग जगात पसरला, जी आमच्या चित्रपटाचीही रिलीज डेटदेखील होती.  आमचा चित्रपट आशा आणि प्रेमाचा एक किरण आहे. तुम्हाला पाहिजे तेथे त्याचा आनंद घेता येईल.'

  • 'दिल बेचारा' ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतोय

सुशांतचा अखेरचा चित्रपट 'दिल बेचारा' येत्या 24 जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 23 वर्षांच्या संजनाचा पहिला बॉलिवूड चित्रपट आहे. त्याचे दिग्दर्शक मुकेश छाबरा आहेत. हा चित्रपट 'द फॉल्ट इन अवर स्टार्स' या हॉलिवूड चित्रपटाचे हिंदी रूपांतर आहे.

0