आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत आत्महत्या प्रकरण:सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून महत्त्वाची आणि मोठी माहिती गायब, वकिलांनी उपस्थित केले प्रश्न

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमार्टम रिपोर्टवर वकिल विकास सिंह यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचा गुंता दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्याच्या निधनाला दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला असून अद्याप त्याच्या आत्महत्ये मागचे कारण स्पष्ट झालेले नाही. सुशांतचे वडील केके सिंह यांनी या प्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसह सहा जणांविरोधात पाटण्यात एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांसह आता ईडीदेखील करीत आहे. तर सीबीआय चौकशीची मागणीदेखील जोर धरत आहे. दरम्यान सुशांतच्या वडिलांचे वकिल विकास सिंह यांनी सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सुशांतचा पोस्टमार्टम रिपोर्ट दिला गेला. पण या रिपोर्टमध्ये त्याच्या मृत्युची वेळ आणि कारण स्पष्ट केले गेलेले नाही, असे वकिल विकास सिंह म्हणाले आहेत..

विकास सिंह म्हणाले, 'सुशांत सिंह राजपूतचा पोस्टमार्टम रिपोर्ट मिळाला आहे. पण यामध्ये त्याचा मृत्यू कशामुळे झाला? त्याची हत्या करून त्याला लटकवले गेले का? की त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली? यासंदर्भात पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काहीच स्पष्ट करण्यात आलेले नाही. एवढचं नव्हे तर त्याच्या मृत्युची वेळच देण्यात आलेली नाही', असे वकील विकास सिंह यांचे म्हणणे आहे.

सिंह पुढे म्हणाले, "पुरावे गायब झाल्यास सीबीआयला त्यांचे काम करणे कठीण होईल. मुंबई पोलिस खूप सक्षम आहेत, परंतु या प्रकरणात त्यांची चौकशी संशयास्पद आहे. असे म्हटले जाते की, सुशांतने सकाळी ज्युस घेतला होता. पण पण कोणीही त्याला ज्युस पिताना पाहिले नाही. अशा परिस्थितीत पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये दिलेल्या वेळेच्या तपशीलावरुन हे कळेल की, त्याचा मृत्यू नेमका कधी झाला?''

  • कुपर हॉस्पिटलवरही उपस्थित केले प्रश्न

सिंह यांच्या म्हणण्यानुसार, कुपर रुग्णालयाकडून कोणालाही सहजपणे प्रमाणपत्र मिळू शकते. हे अत्यंत कुप्रसिद्ध रुग्णालय आहे. सुशांतचे पार्थिव तेथे पोस्टमार्टमसाठी नेले जाणे संशयास्पद आहे.

  • फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये झाले मोठे खुलासे

कलिना फोरेन्सिक लॅबकडून सुशांत सिंह राजपूतचे टॉक्सिकोलॉजी, लिटिगेशन मार्क, नेल सॅम्पल आणि स्टमक वॉश यासंबंधीचे अहवाल समोर आले. यातील स्टमक वॉश रिपोर्टमधून हे स्पष्ट झाले आहे की, सुशांतवर विषप्रयोग करण्यात आलेला नव्हता. त्यानेही अशा कोणत्याही पदार्थाचे सेवन केले नव्हते. नेल सॅम्पलिंगच्या अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार मृत्यूच्या वेळी कोणत्याही प्रकारची बळजबरी झाली नव्हती. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या तोंडातून जो फेस आला होता, तो कपड्यांवर पडून सुकल्यामुळे सफेद रंगाच्या डागाप्रमाणे दिसत होता. या रिपोर्टनुसार सदर प्रकरणात कोणत्याही प्रकारची झटापट किंवा मारामारी झालेली नाही.

बातम्या आणखी आहेत...