आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आता आठवणीत सुशांत:निधनानंतर 8 दिवसांनी पाटण्याच्या घरी झाली सुशांतसाठी प्रार्थना सभा, कुटुंबीय आणि मित्रांनी वाहिली आदरांजली 

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतचे 14 जून रोजी मुंबईत निधन झाले.
Advertisement
Advertisement

दिवंगत अभिनेते सुशांत सिंह राजपूतसाठी रविवारी त्याच्या मुळगावी पाटणा येथे प्रार्थना सभा झाली. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका खोलीत पांढ-या फुलांची सजावट करण्यात आली असून त्यात सुशांतचा हसतानाचा फोटो ठेवण्यात आला आल्याचं दिसतंय.   

सुशांतचे वडील पाटण्यातील राजीव नगरमधील रोड नंबर 6 येथे राहतात. यावेळी सुशांतच्या कुटुंबातील सदस्यांसह, नातेवाईक, मित्र आणि जवळच्या लोकांनी जड अंतःकरणाने सुशांतची आठवण काढून त्याला आदरांजली वाहिली.

सुशांत सिंह मूळचा बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील होता. 90 च्या दशकात त्याचे संपूर्ण कुटुंब पाटण्यात आले. वडील के. के. सिंह सरकारी अधिकारी होते. सुशांतचे शालेय शिक्षण पाटण्यातील सेंट कॅरेन्स स्कूलमध्ये झाले. यानंतर त्याचे कुटुंब दिल्लीत आले होते. खगडिया येथे सुशांतचे आजोळ आहे. गेल्यावर्षी येथे सुशांतचा मुंडन सोहळाही पार पडला होता. 

सुशांतचे 14 जून रोजी मुंबईत निधन झाले

सुशांतचे 14 जून रोजी मुंबईतील त्याच्या राहत्या घरी निधन झाले. 34 वर्षीय अभिनेत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या पार्थिवावर 15 जून रोजी मुंबईतील विलेपार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुशांतच्या घरातून कोणतीही सुसाइड नोट पोलिसांना मिळालेली नाही. सुशांतला नैराश्याने ग्रासल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून त्याच्या ओळखीच्या लोकांची चौकशी करत आहेत आणि आत्महत्येमागील गूढ सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

  • 2008 मध्ये टीव्हीवर पदार्पण

सुशांतने 2008 मध्ये एकता कपूरच्या शो 'किस देश में है मेरा दिल'मधून सेकंड लीड अॅक्टरच्या रुपात  टीव्हीवर पदार्पण केले होते. यानंतर एकताने त्याला 'पवित्र रिश्ता' या मालिकेत मुख्य भूमिका दिली. जवळपास चार वर्षे एकताबरोबर काम केल्यानंतर सुशांतने 2013 मध्ये 'काय पो चे' या चित्रपटासाठी टीव्ही सोडण्याचे ठरविले.

सुशांतने 7 वर्षांच्या चित्रपट कारकीर्दीत 12 चित्रपटांत काम केले. यामध्ये ‘पीके’, ‘एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी' आणि 'छिछोरे 'यासारख्या हिट चित्रपटांचा समावेश आहे. सुशांतचा शेवटचा रिलीज झालेला चित्रपट ‘ड्राईव्ह’ होता जो मागील वर्षी नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आला होता. लॉकडाऊनमुळे त्याचा 'दिल बेचार' हा चित्रपट अद्याप प्रदर्शित होऊ शकला नाही. हादेखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असल्याची चर्चा आहे.

Advertisement
0