आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Sushant Singh Rajput’s Sister Hits Back At Rhea Chakraborty For Worrying About Paying Rs 17K EMI But Hiring The ‘Most Expensive Lawyer’

सुशांतच्या कुटूंबाने पकडला रियाचा खोटारडेपणा:सुशांतच्या बहिणीने रियावर निशाणा साधत विचारले - '17 हजारांचा ईएमआय भरण्याची चिंता आहे तर मग देशातल्या सगळ्यात महागड्या वकिलांची फी कशी देतेय?'

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रियाने भारतील प्रसिद्ध वकिलांपैकी एक असलेल्या सतीश मानशिंदे यांना नेमले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर आता रिया चक्रवर्ती मीडियासमोर आली आहे. विविध वृत्तवाहिन्यांना मुलाखत देऊन ती आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत आहे, पण तिचा हा प्रयत्न अपयशी ठरताना दिसतोय. रियाने अलीकडेच दोन वृत्त वाहिन्यांना मुलाखत दिली. पण दोन्ही मुलाखतींमध्ये दिलेल्या स्पष्टीकरणामुळे ती ट्रोलिंगला बळी पडली आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत रियाने सुशांतशी संबंधित बर्‍याच गोष्टी उघड केल्या. तिने तिच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र रियाने कथन केलेल्या गोष्टींवर सुशांतचे चाहते विश्वास ठेवायला तयार नाहीत. तर दुसरीकडे सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्ती हिनेदेखील तिच्या अनेक वक्तव्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अलीकडेच श्वेता सिंह किर्तीने रियाने सांगितलेल्या गोष्टींवर प्रश्न उपस्थित करत ती खोटे बोलत असल्याचे सांगितले आहे.

  • श्वेताने रियाला विचारला एक प्रश्न

श्वेताने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीची रियाची एक क्लिप आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे, ज्यामध्ये रिया मुंबईतील आपल्या एका फ्लॅटचा ईएमआय कसा भरणार? याची चिंता व्यक्त करताना दिसतेय

रिया क्लिपमध्ये म्हणतेय, 'मी खार (मुंबईचा एक परिसर) मध्ये जी प्रॉपर्टी विकत घेतली होती त्याची किंमत 72 लाख रुपये आहे. यासाठी मी एचडीएफसी बँकेतून 50 लाखांचे कर्ज घेतले होते. मी अजूनही हे कर्ज फेडत आहे. परंतु, सध्या या घरासंबंधित सगळी कागदपत्रे ईडीकडे आहेत. माझे पूर्ण आयुष्य उद्धवस्त झाले आहे. अशा परिस्थितीत मी महिन्याला 17 हजारांचा इएमआय कसा काय देऊ', असे रिया म्हणाली आहे.

रियाच्या या वक्तव्यावर श्वेताने प्रश्न उपस्थित केला आहे. ही क्लिप शेअर करुन श्वेताने तिला प्रश्न विचारला की, ''17 हजारांचा ईएमआय कसा देणार याची तुला चिंता आहे? मग प्लीज मला एक गोष्ट सांग देशातल्या सगळ्यात महागड्या वकिलांची फी तू कशी देतेय?'' #RiaTheLiar असा हॅशटॅगही श्वेताने दिला आहे.

  • सतीश मानशिंदे हे आहेत रियाचे वकील

रियाने अभिनेता सलमान खान आणि संजय दत्त यांची केस लढणाऱ्या भारतील प्रसिद्ध वकिलांपैकी एक असलेल्या सतीश मानशिंदे यांना नेमले आहे. काळवीट शिकार प्रकरणात अभिनेता सलमान खान आणि 1993 मधील बॉम्बस्फोट प्रकरणात अडकलेल्या अभिनेता संजय दत्तचा खटला सतीश मानशिंदे यांनी लढला होता आणि त्यांना जामीन मिळवून देण्यात त्यांना यश आले होते. त्यांची फी कोटींमध्ये आहे.