आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुःखद:सुशांतच्या कुटुंबीयांवर आणखी एक आघात; सुशांतच्या मृत्यूचा जबर मानसिक धक्का बसल्याने वहिनीचे निधन

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतच्या मोठ्या चुलत भावाची पत्नी सुधा देवी यांचे पुर्निया येथे सोमवारी दुपारी निधन झाले.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या अकाली एक्झिटने चित्रपटसृष्टीसह चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. बॉलिवूडमध्ये यशस्वी कारकिर्द सुरु असताना सुशांतने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले हाच प्रश्न सगळ्यांना पडला आहे. सुशांतच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी साडेचार वाजता विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

पाटण्याहून सुशांतच्या वडिलांसह काही मोजके नातेवाईक सोमवारी मुंबईत दाखल झाले होते. सुशांतला अखेरचा निरोप द्यायला फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीतील त्याचे काही मित्रमंडळी यावेळी उपस्थित होते. श्रद्धा कपूर, अर्जुन बिजलानी, राजकुमार राव, उदित नारायण, दिग्दर्शक अभिषेक कपूर, क्रिती सेनन यांच्यासह चाहत्यांनी सुशांतला अलविदा केले. 

सुशांतच्या निधनाने त्याच्या कुटुंबीय मोठा धक्का बसला असतानाच त्याच्या कुटुंबातील आणखी एका सदस्याचे निधन झाले आहेय. टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, बिहारमध्ये सुशांतच्या चुलत भावाच्या पत्नीचे निधन झाले आहे. सुशांतच्या मृत्यूचा जबर मानसिक धक्का बसल्यामुळे त्याच्या चुलत भावाच्या पत्नीने परवापासून अन्नचा कणही घेतला नव्हता असे सांगण्यात येत आहे. 

सुशांतच्या मोठ्या चुलत भावाची पत्नी सुधा देवी यांचे पुर्निया येथे सोमवारी दुपारी निधन झाले. सुशांतच्या मृत्यूमुळे सुधा यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. सोमवारी मुंबईत सुशांतवर अत्यंसंस्कार करण्यात आले त्याचवेळी सुधा यांनी अखेरचा श्वास घेतला. सुशांतने आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर सुधा यांनी अन्नपाणी सोडले होते. 

बातम्या आणखी आहेत...