आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बहिणीची भावाला श्रद्धांजली:सुशांतची आठवण काढून भावूक झालेल्या बहिणीने लिहिले - 'मला माहित आहे तुला खूप त्रास होत होता', पण नंतर पोस्ट डिलीट केली

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 15 जूनला सुशांतच्या अंत्यसंस्कारात श्वेता सहभागी होऊ शकली नव्हती.

सुशांतसिंग राजपूतची बहीण श्वेता सिंह कीर्ती अमेरिकेहून पाटण्याला पोहोचली आहे. गुरुवारी, ती सुशांतच्या अस्थी विसर्जनाच्या वेळी सहभागी झाली होती. याची माहिती स्वतः श्वेताने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली. 

यापूर्वी श्वेताने फेसबुकवर सुशांतसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली पण नंतर ती डिलीटदेखील केली. या पोस्टसह सुशांतने तिच्यासाठी एकेकाळी लिहिलेले कार्डदेखील शेअर केले होते. 

  श्वेताने लिहिले होते, 'माझा बेबी, माझा बाबू, माझा बच्चा... आज तू देहरुपाने आमच्यात नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे. तुला खूप त्रास होत होता, हेही मला माहित आहे. पण तू एक लढवैय्या होतास हेही तितकंच खरे आहे. मोठ्या धैर्याने तू सगळ्याला सामोरे जात होतास. मला माफ कर. तुला ज्या-ज्या त्रासातून जावे लागले, त्या सगळ्यासाठी मनापासून माफी मागते. जर माझ्या हातात असते, तर तुझी सारी दु:ख मी स्वत: वर घेतली असती आणि माझा सगळा आनंद तुला दिला असता. तुझ्या चमकत्या डोळ्यांनी जगाला स्वप्न पाहायला शिकवले. तुझ्यावर कायम असंच प्रेम असेल.. तू जिथे कुठे असशील तिथे आनंदात रहा”, अशा आशयाची पोस्ट श्वेताने लिहिली होती. 

श्वेताने सुशांतसाठी लिहिलेली ही पोस्ट नंतर डिलीट केली.

14 जून रोजी झाले निधन: सुशांतने 14 जून रोजी सकाळी मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. जेव्हा पाटण्यात त्याच्या घरी ही बातमी वडिलांना कळली तेव्हा ते पुरते कोलमडून गेले होते. 15 जून रोजी ते पाटण्याहून मुंबईला आले आणि त्यानंतर कुटुंबाच्या उपस्थितीत सुशांतवर अंत्यसंस्कार करण्यात आले. श्वेता 17 जूनला अमेरिकेतून भारतात येऊ शकली आणि यामुळे 15 जूनला सुशांतच्या अंत्यसंस्कारात ती सहभागी होऊ शकली नव्हती.

0