आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता सुशांत सिंह राजपूतची बहीण प्रियांका सिंह हिचे काही जुने व्हॉट्सअॅप चॅट्स समोर आले आहेत. हे चॅट तिने तिचे भावोजी ओपी सिंह यांना पाठवले होते. या मेसेजमध्ये प्रियांकाने सुशांतची गर्लफ्रेंड रियावर संशय व्यक्त करत लवकरात लवकर सुशांतला तिच्या तावडीतून सोडण्यात यावे अशी विनंती केली होती.
'सुशांतला वाचवावे लागेल'
टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, प्रियांकाने आपल्या चॅटमध्ये भावोजी ओपी सिंह यांना सांगितले होते की, सुशांतला वाचवण्यासाठी कुटुंबाला आता एकत्र यावे लागेल, कारण वेळ निघून जातोय. सॅम्युअल मिरांडा आणि श्रुती मोदी हे रियाचे दोन खास साथीदार आहेत, जे सुशांतचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक नुकसान करण्याच्या रियाच्या कटात सहभागी आहेत. सुशांतच्या पैशांवर ऐश करणे आणि इंडस्ट्रीमध्ये त्याच्या ओळखीवरुन कनेक्शन बनवणे हा रियाचा हेतू आहे. रिया सुशांतचा वापर काम, प्रसिद्धी आणि पैशासाठी करत आहे. हे रियाचे बॉलिवूडचे स्वप्न आहे', असे प्रियांकाने आपल्या चॅटमध्ये म्हटले होते.
प्रियांकाने तिच्या चॅटमध्ये पुढे लिहिले की, रिया सुशांतला ज्या डॉक्टरांकडे घेऊन गेली होती, त्यांची तो औषधे घेत होता. प्रियांकाने लिहिले, रिया त्याला तीन डॉक्टरांकडे घेऊन गेली होती. तीन डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे तो खात होता. राणी दीकडे त्याची सॉफ्ट कॉपी आहे. गुलशन (सुशांत) मानसिकदृष्ट्या कमजोर झाला आहे आणि सतत आजारी राहतोय. त्यामुळे तो स्वत: साठी काहीही करण्याची स्थितीत नाही आणि आता बरीच औषधे घेत आहे.'
प्रियांकाचे हे म्हणणे ऐकून ओपी सिंह यांनी सुशांतला एक मेसेज पाठवला होता. ज्यात त्यांनी लिहिले की, “कुटुंबातील सदस्यांना तुझ्या तब्येतीची काळजी वाटत आहे. तू काही चुकीच्या लोकांच्या तावडीत सापडला आहे, असे त्यांना वाटत आहे. हे लोक तुला चुकीची औषधे देत आहेत आणि तुझी भूक, झोप कमी करुन तुला नैराश्येत ढकलत आहेत, जेणेकरून तुला ते आपल्या नियंत्रणाखाली ठेवू शकतील', असे सुशांतच्या भावोजींनी त्याला म्हटले होते.
'हे लोक तुझ्या कॉन्टॅक्टचा गैरवापर करीत आहे आणि तुझा पैसा वाया घालवत आहेच. त्यांनी तुझी विश्वासार्ह टीम काढून टाकली आहे आणि आता तुझ्या आयुष्यावर ताबा मिळवण्याचा प्रय़त्न करत आहेत. हे दिवसाढवळ्या लुट आणि अपहरणासारखे दिसत आहे. मी वांद्र्याच्या डीसीपींना या संबंधित माहिती दिली आहे. काही चुकीचे घडले तर पोलिसांना त्याबद्दल माहिती असायला हवी', असेही सिंह यांनी सुशांतला पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.