आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत आत्महत्या प्रकरण:भावाला न्याय मिळवून देण्यासाठी बहीण श्वेता हात जोडून म्हणाली - निष्पक्ष चौकशीची मागणी करणे हा आमचा अधिकार आहे, सत्य समोर आले पाहिजे

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या प्रकरणातील सत्यता समोर आणली जावी अशी मागणी वारंवार सुशांतच्या कुटुंबीयांकडून केली जात आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सर्वोच्च न्यायालय रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर आज निर्णय देणार आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिस, बिहार पोलिस की सीबीआय, याबाबत आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देऊ शकते. या प्रकरणातील सत्यता समोर आणली जावी अशी मागणी वारंवार सुशांतच्या कुटुंबीयांकडून केली जात आहे. दरम्यान कोर्टाच्या निर्णयापूर्वी सुशांतची मोठी बहीण श्वेता सिंह किर्तीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करुन सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

  • सुशांतची बहीण म्हणाली - सत्य जाणून घेण्याचा आमचा हक्क आहे

सुशांतची बहिण श्वेताने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिने म्हटले आहे की, 'मी तुम्हाला एक विनंती करते की सर्वांनी पुन्हा एकदा एकत्र यावे आणि या केससाठी सर्वांनी एकजूट होऊन सीबीआय चौकशीची मागणी करावी. आम्हाला सत्यता जाणून घ्यायची आहे आणि हे सत्य जाणून घेण्याचा आमचा अधिकार आहे. जर असे नाही झाले तर आम्ही सत्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. आम्ही शांतीपूर्ण जीवन जगू शकणार नाही.'

श्वेताने आपला हा व्हिडिओ पंतप्रधान कार्यालय, पीएम नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनादेखील टॅग केला आहे.

  • आम्हाला एखाद्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यास मदत करा

यापूर्वी बुधवारी रात्री उशिरा ट्विटमध्ये श्वेताने लिहिले की, "हीच वेळ आहे, जेव्हा आपल्याला सत्य समजू शकेल आणि न्याय मिळू शकेल. कृपया आमच्या कुटुंबास आणि संपूर्ण जगास सत्य जाणून घेण्यासाठी आणि निष्कर्षापर्यंत पोहोचण्यास मदत करा. अन्यथा आम्ही कधीही शांततेत जगू शकणार नाही.'

  • आज न्यायालय देऊ शकतं निर्णय

सुशांतच्या मृत्यूनंतर 25 जुलै रोजी त्याचे वडील केके सिंह यांनी पाटण्यातील राजीव नगर पोलिस ठाण्यात एक एफआयआर दाखल केला होता. यात त्यांनी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसह सहा जणांविरोधात सुशांतची आर्थिक फसवणूक आणि त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. यावर या प्रकरणाचा तपास बिहार पोलिसांनी नव्हे तर मुंबई पोलिसांनीच करावा अशी मागणी करणारी याचिका रियाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकार आणि रिया चक्रवर्तीने सीबीआयने नोंदवलेली एफआयआर मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्याची मागणी केली आहे. तर बिहार सरकार आणि सुशांतच्या वडिलांच्या वकिलांनी याला विरोध दर्शविला आहे.

आज सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणातील सर्व पक्ष लेखी युक्तिवाद सादर करतील. या प्रकरणाची चौकशी सीबीआय करेल की मुंबई पोलिस यावर न्यायालयाचा निर्णय येणे बाकी आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी सुशांतच्या कुटुंबीयांची इच्छा आहे. यापूर्वी 11 ऑगस्ट रोजी यावर सुनावणी झाली होती. तेव्हा न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता.

बातम्या आणखी आहेत...