आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत आत्महत्या प्रकरण:अंकिता लोखंडेला मिळाला सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता सिंह किर्तीचा पाठिंबा, म्हणाली - सत्यमेव जयते

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अलीकडेच एका मुलाखतीत अंकिता म्हणाली - सुशांत डिप्रेशनमध्ये जाणारी व्यक्ती नव्हता.

अभिनेत्री अंकिता लोखंडेला सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता सिंह किर्तीचा पाठिंबा मिळाला आहे. अलीकडेच अंकिताने दिलेल्या मुलाखतीच्या लिंकसह श्वेताने अशोक स्तंभाचा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करुन #सत्यमेव जयते #इंडियाफॉरसुशांत हे हॅशटॅग जोडले आहेत.

  • अंकिता म्हणाली - सुशांत डिप्रेशनमध्ये जाणारी व्यक्ती नव्हता

सुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडेने पहिल्यांदाच रिपब्लिक टीव्हीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने सुशांतसंबंधीच्या अनेक गोष्टी सांगितल्या. ती म्हणाली, ''सुशांतला डायरी लिहिण्याची सवय होती. तो या डायरीमध्ये त्याच्या पुढच्या पाच वर्षांचे प्लॅन लिहून ठेवत असे. सुशांतला सर्वजण नैराश्यामध्ये असलेल्या मुलापेक्षा एक हिरो म्हणून काय लक्षात ठेवतील. तो एक साधा मुलगा होता. छोट्या गावातून आलेला. त्याने इंडस्ट्रीमध्ये चांगले नाव कमावले होते. आतापर्यंत मी त्याला जितके ओळखते त्यावरून इतके सांगते की, तो डिप्रेशनमध्ये जाणारी व्यक्ती नव्हता. त्याच्या विषयी बायपोलर किंवा नैराश्यात असलेला मुलगा हे शब्द वापरणे चुकीचे ठरेल'', असे अंकिता म्हणाली. सुशांतच्या वडिलांनी सुशांतला शेती करायची असल्याचे म्हटले होते. हे खरं आहे सांगत ती म्हणाली, सुशांतला शॉर्ट फिल्म देखील तयार करायच्या होत्या.

  • 'त्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळायचा'

अंकिता मुलाखतीत पुढे म्हणाली, "सुशांत नेहमी मला एक गोष्ट सांगायचा की, यश आणि अपयाशात एक लाइन असते, जी महेंद्र सिंह धोनी फॉलो करतो. जेव्हा काही चांगले घडते तेव्हा तो सेटल असतो आणि जेव्हा काही वाईट घडले तेव्हादेखील तो सेटल असतो. मला असेच व्हायचे आहे. सुशांतवर कधीही यशामुळे तो कधीही हुरळून गेला नाही, किंवा अपयशामुळे कधी खचला देखील नाही. सुशांतचा असा विश्वास होता की, आनंद हा एका क्षणाचा असतो. तो प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळवत असे. त्याला मुलांना शिकवण्यात आनंंद मिळायचा. तारे बघून तो आनंदित व्हायचा. त्याने बर्‍याच मुलांना शिकवले होते. ही त्याची आवड होती", असे अंकिताने सांगितले.

  • सुशांत-अंकिता 7 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते

पवित्र रिश्ता या मालिकेत एकत्र काम करत असताना सुशांत आणि अंकिता एकमेकांच्या प्रेमात पडले होते. जवळपास सात वर्षे हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते, पण 2016 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. रिलेशनशिपमध्ये असताना अंकिताचे सुशांतच्या कुटुंबाशी चांगले संबंध होते. सुशांतच्या बिहारच्या घरीही ती दोनदा गेली होती. याशिवाय तिची सुशांतची बहीण श्वेताशीही चांगली बाँडिंग होती. श्वेताने तिच्या ट्विटर अकाउंटवर अंकिताबरोबरचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

काही वर्षांपूर्वी श्वेताने शेअर केलेली छायाचित्रे
काही वर्षांपूर्वी श्वेताने शेअर केलेली छायाचित्रे