आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत प्रकरणात मोठा दावा:स्वतःला हॉस्पिटलमधील कर्मचारी सांगणारा व्यक्ती म्हणाला - सुशांतच्या गळ्यावर सुईच्या खुणा होत्या, पाय देखील तुटला होता; बहीण म्हणाली- अरे देवा, त्यांनी माझ्या भावासोबत काय-काय केले?

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुशांत सिंह राजपूतचे 14 जून रोजी मुंबईत निधन झाले. स्वतःला इस्पितळातील कर्मचारी सांगणारा हा व्यक्ती म्हणतोय, की त्याने सुशांतचे पार्थिव स्मशानभूमीत पोहोचवले होते.
  • सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता सिंह किर्तीने ट्विटरवर व्हिडिओ शेअर करुन आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे
  • स्वतःला रुग्णालयातील कर्मचारी असल्याचे सांगणा-या या व्यक्तीने दावा केला की, रिया 25 मिनिटे सुशांतच्या पार्थिवाजवळ थांबली होती.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला अडीच महिन्यांचा कालावधी उलटला आहे. पण त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली? हे रहस्य सोडवण्यासाठी सीबीआय 9 दिवसांपासून चौकशी करत आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये रुग्णालयाचा कर्मचारी असल्याचा दावा करणारा एका व्यक्तीने सुशांतच्या घश्यावर खुणा आणि त्याच्या पाय तुटला असल्याचा दावा केला आहे. श्वेताने कॅप्शनमध्ये लिहिले, "अरे देवा. अशी बातमी ऐकून मला मनातून वेदना होत आहेत. त्यांनी माझ्या भावासोबत काय काय केले? कृपया त्यांना अटक करा."

  • सुशांतच्या गळ्यावर सुईसारखी खूण होती?

श्वेताने जो व्हिडिओ शेअर केला आहे तो न्यूज नेशनच्या बातमीचा एक भाग आहे. यात स्वत:ला हॉस्पिटलचा कर्मचारी सांगणारा व्यक्ती सांगतोय, "हा एक खून आहे हे आम्हाला माहित होते. घश्यावर सुईसारख्या 15-20 खुणा होत्या. जणू सुया टोचल्या आहेत, असे ते दिसत होते. त्याच्या गळ्यावर टेप चिकटवली होती. मी त्याचे पार्थिव रुग्णवाहिकेच्या आत ठेवले होते. आणि ते स्मशानभूमीपर्यंत नेले होते. त्याचा पाय तुटलेला होता. त्याचा मृतदेह कूपर हॉस्पिटलमध्ये आला तेव्हा त्याचा पाय वाकला होता", असा खुलासा या व्यक्तीने केला आहे.

  • रिया चक्रवर्तीने मागितली होती माफी

ही व्यक्ती पुढे म्हणाली, "रिया चक्रवर्ती जेव्हा तिथे आली, तेव्हा तिच्यासोबत दोन पुरुष होते. लांब केस असलेला एक माणूस होता. त्याने मला विचारले की, मी पार्थिव दाखवू शकतो का? मी बॉडी दाखवली, तेव्हा तिने माफी मागितली. आणि काहीतरी बोलली. पण तेव्हा मला बाहेर पाठवण्यात आले होते. 25 मिनिटे ती आत होती आणि माफी मागत होती. मोठे डॉक्टरसुद्धा हे हत्याकांड असल्याचे सांगत होते. ही आत्महत्या नाही."

  • सुशांतचा मृतदेह पिवळा पडला होता

या व्यक्तीने सांगितल्यानुसार, सुशांतचे शरीर पिवळे पडले होते. तो म्हणाला, "शरीराकडे पाहून आम्ही ओळखतो. फाशी घेतलेले शरीर कधीही पिवळे पडत नाही. छाती व पायांवर पिवळ्या खुणा होत्या. दोन्ही तळांवर सुई टोचल्यासारख्या 3-4 खुणा देखील होत्या."

कूपर रुग्णालयाच्या पोस्टमॉर्टम अहवालात सुशांतच्या मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे म्हटले आहे. त्याच्या शरीरावर कोणत्याही खुणा नसल्याचे त्यात म्हटले आहे. व्हिसेरा अहवालातदेखील सुशांतचा मृत्यू फाशी घेऊन गुदमरल्यामुळे झाला असल्याचे सांगण्यात आले आहे.

  • गळ्यावर लिगेचर मार्क असल्याचे आले समोर

अलीकडेच सुशांतचा शवविच्छेदन (पोस्टमॉर्टम) अहवाल समोर आला असून त्याची प्रत दैनिक भास्करकडे आहे. अहवालानुसार- सुशांतच्या गळ्यावर 33 सेंमी लांबीचा लिगेचर मार्क होता. त्याला साध्या भाषेत 'खोल जखम' म्हणतात. हे सहसा 'यू' आकाराचे असते. ज्यावरून असे सूचित होते की, दोरीवरून किंवा जड वस्तूच्या दाब गळ्यावर पडला असावा. यानंतर सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी प्रश्न उपस्थित केले. सिंह म्हणाले- मृत्यूच्या वेळी ज्या गोष्टी नमूद केल्या गेल्या त्यांचा तपशील शवविच्छेदन अहवालात नाही का? शवविच्छेदन अहवालात मृत्यूची वेळ नमूद केलेली नाही. असे का केले गेले?

  • एम्सची टीम ऑटोप्सी फायलींची चौकशी करेल

सुशांत सिंह राजपूतच्या ऑटोप्सी फायली तपासण्यासाठी एम्सने शुक्रवारी फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पाच सदस्यीय मेडिकल बोर्ड गठीत केले आहे. शुक्रवारी सीबीआयने याप्रकरणी एम्सचे मत जाणून घेतले. या पथकाचे नेतृत्व एम्सचे फॉरेन्सिक विभाग प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता करत आहेत. ते म्हणाले, “आम्ही हत्येच्या संभाव्यतेकडे लक्ष देऊ, जर सर्व शक्य अँगलने याची सखोल चौकशी केली जाईल.” गुप्ता म्हणाले की, 'संरक्षित व्हिसेराचा तपास केला जाईल आणि सुशांतला नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी देण्यात येणार्‍या औषधांचे विश्लेषण एम्स प्रयोगशाळेत केले जाईल."