आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हृदयस्पर्शी प्रतिक्रिया:जेव्हा सुशांतच्या पाच वर्षांच्या भाच्याला समजली त्याच्या निधनाची बातमी, चिमुकला आईला म्हणाला - 'तो तर आपल्या मनात आजही आहे'

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे -  आईच्या मैत्रिणीच्या कडेवर निर्वाण. उजवीकडे - बहीण श्वेतासोबत सुशांत सिंह राजपूत - Divya Marathi
डावीकडे - आईच्या मैत्रिणीच्या कडेवर निर्वाण. उजवीकडे - बहीण श्वेतासोबत सुशांत सिंह राजपूत
  • सुशांत हा चार बहिणींचा एकुलता एक भाऊ होता.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आता आपल्यात नाही. ही बातमी जेव्हा अमेरिकेत वास्तव्याला असलेल्या सुशांतच्या बहिणीने तिच्या पाच वर्षांच्या मुलाला दिली तेव्हा त्याने यावर अतिशय  हृदयस्पर्शी प्रतिक्रिया दिला.  सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने आपल्या चिमुकल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर शेअर केली आहे.

चिमुकला निर्वाण आपल्या आईला म्हणाला-  'तो तर आपल्या मनात आजही आहे'

सुशांतची बहीण श्वेताने सोमवारी रात्री फेसबुकवर लिहिले. “जेव्हा मी निर्वाणला तुझा मामा या जगात नाही असे सांगितले, तेव्हा तो तर आपल्या मनात आजही आहे, असे निर्वाण निरागसपणे पटकन बोलून गेला. हे एकच वाक्य तो सलग तीन वेळा म्हणाला. जर एक पाच वर्षांचा मुलगा असे बोलत असेल तर विचार करा आपल्याला किती धीराने रहायला हवे. तुम्ही सगळे धीराने या प्रकाराला सामोरे जा. विशेषतः सुशांतचे चाहते. हे लक्षात घ्या तो आपल्या मनात कायम आहे आणि या पुढेही असेल. कृपया असे काही करुन नका, ज्यामुळे त्याला वाईट वाटेल, त्याला आवडणार नाही”, अशी पोस्ट श्वेताने केली आहे.

रविवारी झाला सुशांतचा मृत्यू 

रविवारी, 14 जून रोजी 34 वर्षीय सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तो बराच काळापासून नैराश्याने ग्रस्त होता. सुशांत हा चार बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. त्याच्या एका बहिणीचे आधीच निधन झाले होते. तर 2002 मध्ये सुशांतच्या आईचे ब्रेन हॅमरेजने निधन झाले होते. सुशांत आपल्या आईच्या खूप जवळ होता. 

श्वेताला भावाचे अंत्यदर्शन घेता आले नाही 

सोमवारी मुंबईतील विलेपार्ले स्मशानभूमीत सुशांतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याचे वडील आणि दोन बहिणी उपस्थित होत्या. पण श्वेता अमेरिकेत असल्याने तिला आपल्या भावाचे अंत्यदर्शन घेता आले नव्हते.  ती 16 जून रोजी अमेरिकेहून दिल्लीत पोहोचली. 

बातम्या आणखी आहेत...