आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची हत्या नसून त्याने आत्महत्या केली आहे, असा अहवाल दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (AIIMS) दिला. हा अहवाल 28 सप्टेंबर रोजी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अहवालात हत्येचा दावा पूर्णपणे फेटाळण्यात आला असून सुशांतने आत्महत्या केल्याचे म्हटले गेले आहे.
या अहवालावर आता सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्ती हिने प्रतिक्रिया दिली आहे. फक्त दोन शब्दांमध्ये तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. श्वेताने सुशांतचा फोटो शेअर करुन "आम्ही जिंकणार" असे म्हटले आहे. इतक्या महिन्यांपासून भावासाठी लढाई लढणाऱ्या श्वेताला आपल्या भावाला न्याय मिळेल असा विश्वास कायम आहे.
We Will Win! 🔱 pic.twitter.com/LZSrqEpBGC
— Shweta Singh Kirti (@shwetasinghkirt) October 3, 2020
14 जून रोजी सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील वांद्रे परिसरातील आपल्या राहत्या घरात गळफास घेतला होता. त्याच्या मृत्यूनंतर सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आली, असा आरोप कुटुंबीयांनी केला होता. एम्सच्या पाच डॉक्टरांच्या समितीने या प्रकरणाचा पूर्ण तपास केला. सुशांतची हत्या झाली असावी असे म्हणता येणार नाही, असे डॉक्टरांच्या टीमने स्पष्ट केले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.