आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरप्राइजिंग:सुशांतच्या आठवणीत लिहिलेली पोस्ट डिलीट केल्यानंतर त्याची थोरली बहीण श्वेताने बंद केले आपले सोशल मीडिया अकाऊंट 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता श्वेताचे फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाऊंट डिलीट झालेले दिसत आहेत.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची थोरली बहीण श्वेता सिंह किर्तीने आपले सोशल मीडिया अकाऊंट्स डिलीट केले आहेत. श्वेता 17 जून रोजी अमेरिकेहून भारतात पोहोचली होती. तिने 18 जून रोजी पाटण्यात झालेल्या सुशांतच्या अस्थी विसर्जनात सहभाग घेतला होता. यापूर्वी श्वेताने सुशांतच्या आठवणीत अनेक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. सोबतच सुशांतने तिला दिलेले एक कार्ड सोशल मीडियावर शेअर करुन  तुझ्या वेदनांची मला जाणिव होती, असेही म्हटले होते. पण आता श्वेताचे फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाऊंट डिलीट झालेले दिसत आहेत. 

अखेरची पोस्टदेखील डिलीट केली होती 

यापूर्वी श्वेताने फेसबुकवर सुशांतसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली होती, पण नंतर ती डिलीटदेखील केली. या पोस्टसह सुशांतने तिच्यासाठी एकेकाळी लिहिलेले कार्डदेखील शेअर केले होते.

श्वेताने लिहिले होते, 'माझा बेबी, माझा बाबू, माझा बच्चा... आज तू देहरुपाने आमच्यात नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे. तुला खूप त्रास होत होता, हेही मला माहित आहे. पण तू एक लढवैय्या होतास हेही तितकंच खरे आहे. मोठ्या धैर्याने तू सगळ्याला सामोरे जात होतास. मला माफ कर. तुला ज्या-ज्या त्रासातून जावे लागले, त्या सगळ्यासाठी मनापासून माफी मागते. जर माझ्या हातात असते, तर तुझी सारी दु:ख मी स्वत: वर घेतली असती आणि माझा सगळा आनंद तुला दिला असता. तुझ्या चमकत्या डोळ्यांनी जगाला स्वप्न पाहायला शिकवले. तुझ्यावर कायम असंच प्रेम असेल.. तू जिथे कुठे असशील तिथे आनंदात रहा”, अशा आशयाची पोस्ट श्वेताने लिहिली होती.

14 जून रोजी झाले निधन: सुशांतने 14 जून रोजी सकाळी मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. जेव्हा पाटण्यात त्याच्या घरी ही बातमी वडिलांना कळली तेव्हा ते
पुरते कोलमडून गेले होते. 15 जून रोजी ते पाटण्याहून मुंबईला आले आणि त्यानंतर कुटुंबाच्या उपस्थितीत सुशांतवर अंत्यसंस्कार करण्यात आले. श्वेता 17 जूनला अमेरिकेतून भारतात
येऊ शकली आणि यामुळे 15 जूनला सुशांतच्या अंत्यसंस्कारात ती सहभागी होऊ शकली नव्हती.

बातम्या आणखी आहेत...