आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटाशी संबंधित फॅक्ट:सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर झाले होते 'दिल बेचारा'च्या क्लायमॅक्सचे डबिंग, आरजे आदित्यने काढला होता सुशांतसारखा आवाज

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपटाचा क्लायमॅक्स आरजे आदित्य चौधरीने सुशांतच्या आवाजाची नक्कल करून डब केला होता.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला जवळजवळ 11 महिने लोटले आहेत. मागील वर्षी 14 जून रोजी त्याने आत्महत्या केली होती. सुशांतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' त्याच्या निधनानंतर चार महिन्यांनी प्रदर्शित झाला होता. सुशांतचा मृत्यू झाला त्यावेळी या चित्रपटाच्या काही भागाचे डबिंग बाकी होते त्यामुळे या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये सुशांतचा स्वतःचा आवाज नाहीये. चित्रपटाचा क्लायमॅक्स आरजे आदित्य चौधरीने सुशांतच्या आवाजाची नक्कल करून डब केला होता. याचा खुलासा स्वतः आदित्यने केला आहे.

अनेक आर्टिस्टमधून झाली होती आदित्यची निवड

आदित्यने एका मुलाखतीत सांगितले, 'दिल बेचारा'चे काही भागाचे व्हॉइस ओव्हरचे काम राहिले होते. जे सुशांत करु शकला नाही. प्रॉडक्शन टीमने त्याच्यासारख्या आवाजचा शोध सुरु केला. अनेक लोकांच्या ऑडिशन झाल्या, मात्र त्यांना हवा तसा आवाज मिळत नव्हता. मग मुकेश छाब्रा यांच्या ऑफिसमधून मला फोन आला आणि त्यांनी मला माझा आवाज ट्राय करण्यासाठी सांगितले.'

पुढे आदित्य म्हणाला, 'मुकेश छाब्रा यांच्या ऑफिसमधून मला ऑडिशनसाठी त्यांनी 'एमएस धोन: द अनटोल्ड स्टोरी'चा एक सीन पाठवण्यात आला. त्यावर त्यांनी मला व्हॉइसओव्हर करण्यास सांगितला. मी अनेक सेलिब्रिटींचे हुबेहूब आवाज काढू शकतो. पण मला सुशांतच्या आवाजासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. मी ऑडिशन क्लिप त्यांना पाठवली तर मला पुन्हा मुकेश छाब्रा यांच्या ऑफिसमधून कॉल आला.'

दोन दिवस केली होती प्रॅक्टिस
आदित्यने सांगितलं की, क्लायमॅक्स सीनसाठी मला फक्त सुशांतच्या आवाजाची नक्कल करायची नव्हती, तर त्या व्यक्तीरेखेच्या भावनासुद्धा त्या आवाजातून जाणवायला हव्या होत्या. यासाठी मी दोन दिवस प्रॅक्टिस केली होती. 'दिल बेचारा' हा दिग्दर्शक म्हणून मुकेश छाब्रा यांचा पहिला चित्रपट होता. चित्रपटात सुशांतसह संजना सांघीची मुख्य भूमिका होती, तर सैफ अली खानचा स्पेशल अपिअरन्स होता.

बातम्या आणखी आहेत...